Home यवतमाळ घाटंजी शहरातील सट्टा व मटका जुगाराचा धंदा जोमात..!

घाटंजी शहरातील सट्टा व मटका जुगाराचा धंदा जोमात..!

129

लागत कमी फायदा जास्त शौकीन सह पोलीस प्रशासन सुध्दा जोमात…! 

विनोद पत्रे 

यवतमाळ – यवतमाळ जिल्हातील तहसील घाटंजी मध्ये नव्यानेच आलेले ठाणेदार निलेश सुरडकर रुजू झाले तेव्हापासून सट्टापटी जुगार चेंगडसह व्यवसाय तेजीत सुरू आहे. या सट्ट्यांचे आकडे लावण्यात पुरुष महिलांसह विद्यार्थ्यीही गुंतले आहेत. या अवैध धंद्यामुळे भावी पिढी बरबाद होत असल्याचे मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे घाटंजी पोलीसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असुन घाटंजी शहरात अवैध मटका जुगार चेंगड व्यवसाय जोरात सुरू आहे. ग्रामीण भागातही याचे जाळे जोरदार पसरले असून बेकायदेशीररीत्या बाजारपेठ जुन्या महाराष्ट्र बँक समोर कार्यालय उघडून बसून आहे घाटंजी पोलीस प्रशासनाच्या भरोशावर हा धंदा सुरू आहे.

फक्त १० रुपयावर एक हजार रुपये मिळत असल्याने अनेक नागरिक, कर्मचारी, व्यापारी व सुशिक्षित बेरोजगार कामगार तसेच हातावर आणुन पानावर खाणारे मजुर मटका जुगारावर नशीब अजमावण्यासाठी सज्ज आहेत. या धंद्यात आता स्पर्धा निर्माण झाली आहे. अधिक जास्त ग्राहक आपल्याकडे मटका जुगार लावण्यासाठी यावे म्हणून मुख्य बाजारपेठ व जुने महाराष्ट्र बँक कडे कार्यालय उघडुन शासनमान्य परवानाप्राप्त व्यवसाय वाढवित आहेत. या अवैध मटका जुगारमुळे कुणाचे घर भरले जात आहे..? तर कुणाचे खाली होत आहे. हे सर्व खुलेआम प्रकार घडत असतांना देखील कुठेतरी घाटंजी पोलीस स्टेशन हद्द या पासून वाचवावी असे सुवैचारीक नागरिकांचे पोलीस प्रशासनाला आव्हान  करून बोलत आहे आहे.