Home भंडारा राज्यस्तरिय आट्यापाट्या स्पर्धेत धाराशिव संघ विजेता तर भंडारा संघ उपविजेता

राज्यस्तरिय आट्यापाट्या स्पर्धेत धाराशिव संघ विजेता तर भंडारा संघ उपविजेता

85

भंडारा :- युवक व क्रिडा विभाग भारत सरकार, महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ, महाराष्ट्र राज्य क्रिडा परिषद व जिल्हा आट्यापाट्या मंडळ छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने ३६ वी मुले व ३२ वी मुली सिनीअर महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या चॅम्पियनशीप २०२३- २०२४ ची स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद येथे नुकतीच घेण्यात आली. त्यात मुलींमध्ये राज्यस्तरिय आट्यापाट्या स्पर्धेत धाराशिव संघ विजेता तर भंडारा संघ उपविजेता ठरला आहे.

भंडारा आट्यापाट्या संघात कर्णधार प्राची चटप, उपकर्णधार मिताली गणविर, कल्याणी बेंदेवार, प्रिया गोमासे, वैष्णवी तुमसरे, पल्लवी गोटेफोडे, आचल भूरे, रूपाली कनोजे, ऋतुजा धुर्वे, अश्विनी साठवणे, नेहा धुर्वे, स्पर्धा मेश्राम यांचा समावेश होता.
त्यावेळी भंडारा आट्यापाट्या संघातील मुलींनी अमरावती, चंद्रपूर, जळगाव, नाशिक यावर विजय मिळविला. फायनलमध्ये अटाटतीच्या स्पर्धेत धाराशिव संघ विजेता तर भंडारा संघ उपविजेता ठरला.
भंडारा आट्यापाट्या संघाचे प्रशिक्षक म्हणुन श्याम देशमुख व व्यवस्थापक दिपाली शहारे यांनी मोलाची भुमिका पार पाडली आहे.
त्यात कर्णधार प्राची चटप व मिताली गणविर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे. त्याबद्दल डॉ. दीपक कविश्वर, महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले इत्यादींनी विजयी चमुंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.