फुलचंद भगत
वाशिम:-पो.स्टे.वाशिम शहर येथे दाखल अप.क्र.९३२/२२, कलम ३७९ भादंवि अन्वये दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास करत असतांना गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे ग्राम शिवणी भेंडेकर, ता.मंगरूळपीर, जि.वाशिम येथील ३२ वर्षीय ईसमास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून पो.स्टे.वाशिम शहर व विविध जिल्ह्यातील एकूण १० मोटारसायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश प्राप्त झाले आहे.
सदर गुन्ह्यात आरोपी नामे संतोष अशोकराव भेंडेकर, वय ३२ वर्षे, रा.शिवणी भेंडेकर, ता.मंगरूळपीर, जि.वाशिम हा निष्पन्न झाल्याने त्याला ग्राम शिवणी भेंडेकर येथून ताब्यात घेऊन त्याच्याजवळून पो.स्टे.वाशिम शहर व विविध जिल्ह्यातील चोरीच्या एकूण १० मोटारसायकल अं.किं.०६.५० लाख रुपये हस्तगत करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अश्या प्रकारचे चोरीच्या मोटारसायकल विनाकागदपत्रांच्या विक्री करतांना आढळून आल्यास किंवा चोरीबाबत माहिती असल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
सदर कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.रामकृष्ण महल्ले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, सपोनि.रमाकांत खंदारे, पोउपनि.शब्बीर पठाण, पोलीस अंमलदार दिपक सोनवणे, प्रशांत राजगुरू, अमोल इंगोले, प्रवीण राऊत, विठ्ठल महाले, विठ्ठल सुर्वे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी पार पाडली.