Home नागपूर महाराष्ट्र पोलीस प्रतिनिधी व सचिव राष्ट्र निर्माण संघटन निलेश नागोलकर यांचे सर्व...

महाराष्ट्र पोलीस प्रतिनिधी व सचिव राष्ट्र निर्माण संघटन निलेश नागोलकर यांचे सर्व महाराष्ट्रातील पोलीस व पोलीस परिवारांना, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना आवाहन आवाहन आवाहन….! 

105

नागपूर – मिशन 2024 विधानसभा निवडणूक – पोलिसांचा प्रतिनिधी आमदार झालाच पाहिजे, आपकी बार महाराष्ट्र पोलीस और पोलीस परिवार की सरकार महाराष्ट्रातील 6 विभाग 35 जिल्हे मिळून सर्व महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्थेचा भार महाराष्ट्र पोलिसांवर डिपेंड आहे. महाराष्ट्र पोलिसांशिवाय कायदा व सुव्यवस्था कोणीही सांभाळू शकत नाही हे सर्वांना माहीत आहे. पोलिसांशिवाय मोठी ताकद आणि सुरक्षा कोणाचीही नाही हे सर्वांना माहीत आहे. पण तरीही कोणताही राजकीय पक्ष पोलिसांसाठी पोलीस मतदार संघ आजपर्यंत तयार करू शकला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे तसेच महाराष्ट्र पोलीस आणि पोलीस परिवारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यातही कुठल्याही राजकीय पार्टीला इंटरेस्ट नाही. राजकारणाला आणि राजकारणातील व्यक्तीला पोलिसांचा गराडा सांभाळतो त्यांना सुरक्षा प्रदान करतो/ सांभाळतो, तरीही महाराष्ट्र पोलिसांचे अनेक प्रश्न कोणताही आमदार खासदार किंवा मंत्री यांना सोडवण्यात कुठलाही रस नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात पोलीस खात्याचे मंत्री आहे पण ते फक्त नावाचेच आहेत असा प्रत्यक्ष अनुभव महाराष्ट्रातील सर्व पोलिसांना 2014 पासून 2024आज पर्यंत आलेला आहे, पोलीस परिवार आणि वर्तमान पोलीस तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना कुठलाही रस नसल्याचे चित्र अनेकांनी अनुभवलेले आहे. महाराष्ट्र पोलिस व पोलीस परिवारांना त्यांचे हक्क व अधिकाराचे तसेच सन्मानाने जगवणारे अनेक प्रश्न आताही प्रलंबित आहेत. निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय पार्टी पोलिसांच्या प्रश्नावर बोलते पण प्रत्यक्षात करत काहीच नाही हाहि अनुभव महाराष्ट्रात पोलीस व पोलीस परिवारांना आला आहे. महाराष्ट्र मध्ये मोठ्या शहरातील ग्रामीण तालुका येथील पोलीस वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिस व पोलीस परिवार राहतो. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संख्या बऱ्यापैकी आहे. जरी आपण विखुरलेले असलो तरी मोठ्या पोलिसांच्या मोठ्या मोठ्या वसाहती जिथे आहे तिथे आपण आपली ताकद दाखवू शकतो, अपक्ष उभे राहणे किंवा सपोर्ट पार्टीने मदत करणे, जिंकणे किंवा हरणे हा एक पार्ट आहे पन यामुळे पोलिस व् पोलीस परिवार यांची खरी ताकद दाखवण्याची वेळ आज आली आहे असे मला वाटत आहे. कारण आज पर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही राजकारणांनी पोलिसांची 100% बाजू कधीही समजून घेतली नाही आणि त्यांच्यासाठी लढलाही नाही तसेच आपल्यासाठी कुठलाही मतदारसंघ राखीव ठेवला नाही, जसे क्रीडा पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ बनविला पण पोलिसांसाठी पोलीस मतदार संघ आजपर्यंत बनवू दिला नाही आणि पोलीस मतदार संघाची मागणी ही पूर्ण केली नाही अशा वेळेस आपणच आपले अस्तित्व मिशन 2024 विधानसभा पोलीस आमदार अपक्ष निवडून देण्याच्या माध्यमातून निर्माण करण्याची वेळ आलेली आहे.  आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात सत्ता करणारा कोणत्याही राजकीय पार्टीने कधीही पोलिसांकडे विशेष लक्ष दिले नाही. प्रत्येक राजकीय पार्टीने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आपल्या पोलिसांचा नेहमी वापर केलेला आहे, 24 तास 365 दिवस ज्या समाजासाठी आपण लढतो मरतो तो ही समाज आपल्या भल्याचा खूप जास्त विचार करताना दिसत नाही, अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांना आपले अस्तित्व निर्माण करण्याची एक नवीन ताकद विधानसभा निवडणूक 2024 च्या माध्यमातून आपल्या पोलिसांच्या हक्काच्या व अधिकाऱ्यांच्या लढ्यासाठी लढणारा अपक्ष उमेदवार उभा करून मिळणार आहे. यामुळे  महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या हक्कासाठी लढणारे नवीन अध्याय सुरुवात होईल,  यासाठी महाराष्ट्राच्या साडेअकरा करोड जनतेला सांभाळणाऱ्या महाराष्ट्र पोलिसातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने, प्रत्येक पोलीस परिवारातील पोलीस बॉईज ने, गर्ल्स ने, पत्नीने, बहिण भावाने, आई-वडिलांनी, सासू-सासर्‍याने, नातेवाईकांनी, मित्राने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी, वर्तमान पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आपल्या पोलीस कॉलनी, वसाहतीचा, व पोलिसांचे घरे कोणत्या विधानसभा क्षेत्रात किती प्रमाणामध्ये आहे, संपूर्ण पोलीस परिवारांचे आणि महाराष्ट्रातील वर्तमान पोलिसांचे किती मतदान आहे व शंभर टक्के किती मतदान निघू शकते याचा अभ्यास करून महाराष्ट्रातील सहा विभाग व पस्तीस जिल्हे मिळून ग्रामीण शहरे तालुकास्तरीय सर्व स्तरावर पोलीस परिवारातील इच्छुक असलेले पोलीस पत्नी पोलीस बॉईज पोलीस गर्ल्स सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी पोलिसांसाठी काम करत असलेले सामाजिक संघटन मधील सामाजिक कार्यकर्ते यांच्या कामाचा व नावाचा विचार करून स्वतःच्या हक्क व अधिकारासाठी लढणारा पोलीस प्रतिनिधी आमदार तयार करण्याचे आव्हान घ्या, कारण आज पर्यंत तुमच्या मतदानाचा तुमच्या बळाचा वापर दुसऱ्या राज्यकर्त्यांनी स्वतःसाठी करून घेतला आहे, त्यामुळे अनेक पोलीस व पोलीस परिवार मिळणारा हक्क व अधिकारांपासून तसेच अनेक सुविधांपासून उपेक्षित व वंचित आहे, अशावेळी आपल्या बळाचा व आपल्या मतदानाचा खरेखुर वापर करण्याची वेळ आलेली आहे. आपल्या हक्कासाठी भांडणारा आपले अपक्ष आमदार उभे करा किंवा जी पार्टी तुम्हाला संधी देत असेल त्याच्याकडून उभे राहून पोलिसांचे हक्काचे आमदार प्रतिनिधी व्हा, पोलीस मतदार संघ होईल तेव्हा होईल पण आता आपली पोलीस परिवाराची व मतदानाची ताकद सरकारला दाखवण्याची खरी वेळ आलेली आहे, आपले अपक्ष आमदार उभे करा किंवा जी पार्टी तुम्हाला संधी देत असेल त्यांच्याकडून तिकीट घेऊन उभे रहा, स्वतःची ताकद दाखवाल तरच तुम्हाला किंमत मिळेल हे समजून घ्या. प्रत्येक पोलीस कुटुंबातील घराघरात हा विषय पोहोचवा मिशन पोलीस आमदार 2024  मिशन पोलीस आमदार 2024 मिशन पोलिस आमदार 2024 विचार करा अभ्यास करा आणि खऱ्या अर्थाने कामाला लागा नाही तर यानंतर कधीही म्हणू नका की आमचा वाली कोणी होऊ शकत नाही किंवा आमचा वाली कोणी नाही…तुमचा वाली कोणीच होणार नाही… तुम्हाला तुमचा वाली स्वतः तयार करावा लागेल मिशन 2024 विधानसभा निवडणूक पोलिसांचा आमदार झालाच पाहिजे..