Home यवतमाळ शाखा अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा उपोषण करणार तक्रारदार – रमेश...

शाखा अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा उपोषण करणार तक्रारदार – रमेश गिरोलकर

78

यवतमाळ – येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता तथा उपविभागीय अभियंता आर एम क्षीरसागर हे आपल्या मनमर्जी नुसार काम करण्यात सर्वत्र प्रसिद्ध आहे.

अनेक कामांची निविदा करीता ना हरकत प्रमाणपत्र पाठबंधारे व मुख्य अधिकारी नगर परिषद यवतमाळ यांच्या ताबा पावती वर बनावट स्वाक्षरी करून ताबा पावती बनावट कागदपत्रे तयार करून झालेल्या कामावरती बांधकाम विभागाची पाटी लावून करोडो रुपये आपल्या घशात घातले असून नगर परिषदेचे मार्फत झालेल्या कामावरती खोटे कागदपत्रे दाखल करून शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांची अफरातफर या शाखा अभियंता त्यानी केली आहे. या कामांची माहिती घेण्यात गेले असता उद्धटपणाची वागणूक देऊन झालेल्या कामाची माहिती देण्यात टाळाटाळ करीत आहे. या संदर्भात शासकीय यंत्रणे कडून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया करण्याकरिता पत्र दिले असता सुद्धा पोलीस अधीक्षक व निरीक्षकांकडून या अभियंत्याला पोटाशी घालण्याचे काम होत आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेले शाखा अभियंता श्रेणी क्रमांक २ चे आर एम क्षीरसागर यांनी कामाला प्रशासकीय मान्यता नसताना व नगरपरिषद यवतमाळ यांच्या नावाची ताबा पावती साक्षरी करून तसेच बनावट स्वाक्षरी करून तसेच कागदपत्र करून उमरसरा येथील वार्ड क्रमांक 22 मध्ये गावंडे ते अंध मूकबधिर रस्ता येथील सिमेंट रस्ता नगरपरिषद मार्फत बनवण्यात आला त्याच कामाला त्या सिमेंट रस्त्याची ला बांधकाम विभाग व शिरसागर यांनी खोटी मोजमाप पुस्तका तयार करून कागदपत्रे दाखल करून मान्यता मिळवून याच रस्त्याचे खाडीकरण व डांबरीकरण हॉट मिक्स रस्ता मोजमापन पुस्तकका मध्ये 105 मीटर लांबीची शासन दरबारी नोंदणी घेतली तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी यवतमाळ यांची बनावट ताबा पावती साक्षरी करून सादर केली.
सदर ही बाब मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयातील भष्टाचारावर मा. जिल्हाधिकारी यांच्या लोकशाही दिनात लक्षात आणून दिली असता अद्यापही कुठली कारवाई झाली नाही.
तसेच दुसऱ्या प्रकरणात अमोलकचंद कॉलेज ते लोकेश इंगोले यांच्या घरापर्यंत रस्त्याला मान्यता नसताना तलावाच्या भिंतीवरून खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले या कामाला कुठलीही प्रशासकीय मान्यता नसतानाही काम कोणत्या फडातून करण्यात आले या संदर्भात माहिती विचारली असता पूर्व उडवा उडवीचे उत्तरे देऊन राजकीय पडवळच्या आधार घेऊन अरेरावीची भाषा शाखा अभियंता करीत आहे. या कामांवर दक्षता व गुणनियंत्रण मंडळ अमरावती यांनी या संदर्भात २४/२/२०२४ रोजी फेर तपासणी केली असता व मोजमाप पुस्तकांमध्ये करारनामा क्रमांक ब-१/२४७ सन १९–२० मोजमाप पुस्तिका मध्ये नोंदी घेतलेल्या आढळून आले आहे. व त्या पद्धतीचा खुलासा दक्षता पथक अमरावती यांनी सादर केला असून या कामाचे अंदाजे 30 लाख रुपये उचलून कंत्राटदाराच्या खात्यात जमा केले आहे मां. लोकायुक्त व मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग अमरावती यांच्या कडे चौकशी करण्यासाठी व शासनाकडून अधीक्षक अभियंता दक्षता व गुणनियंत्रण मंडळ अमरावती अधिक्षक अभियंता सा बा.विभाग मंडळ यवतमाळ अधीक्षक अभियंता व गुण नियंत्रक मंडळ अमरावती मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती तसेच माननीय मुख्य अधिकारी नगर परिषद यवतमाळ यांनी जिल्हाधिकारी यांना लोकशाही दिनाच्या दिवशी ही बाब लक्षात आणून दिली. त्यानुसार कार्यकारी अभियंता मुकडे यांनी ९ .२.२०२४ रोजी शहर पोलीस स्टेशन यवतमाळ यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार नोंदविण्याकरिता गेले असता राजकीय दबामुळे व ठाणेदार हा गुन्हा दाखल करून घेत नसल्याची जाणिव वरील पत्र्याच्या अनुषंगाने लक्षात आणून दिले.
आर एम क्षिरसागर यांनी शासनाची फसवणूक करून तीस लाखाच्या नुकसान केले असता सुद्धा व सर्व पुरावे असून सुद्धा ठाणेदार यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हे गुन्हा दाखल करून घेत नाही तसेच प्रशासकीय व्यवस्था राजकीय बळाला बळी पडून पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक हे सुद्धा गुन्हे दाखल करण्यास विलंब का करीत आहे. त्यामुळे पोलीस विभागाच्या सदर कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सदर प्रकरणात गुन्हा नोंदवा अन्यथा विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती यावेळी तक्रारदार रमेश गीरोलकर यांनी दिली. पोलीस महानिरीक्षक अमरावती यांच्या कार्यालयासमोर पोलीस अधीक्षक यवतमाळ तथा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चवरे सदर प्रकरण दाबल्या प्रकरणी त्याच्यावर कार्यवाही करण्याबाबत उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली.