Home मराठवाडा पत्रकार बबलू शेख बारुळकर यांना युवा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पत्रकार बबलू शेख बारुळकर यांना युवा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

127

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. ०६ :- अक्षरोदय साहित्य मंडळ, ऑनलाईन कविकट्टा समूह व मूकनायक वाचनालय मांजरम यांच्या वतीने देण्यात येणारा ‘युवा जीवन गौरव पुरस्कार’ माझा नांदेड लाईव्हचे संपादक तथा दै. लोकशाशनचे जिल्हाप्रतिनिधी बबलू शेख बारुळकर यांना जाहीर झाला आहे.
अक्षरोदय साहित्य मंडळ, नायगाव, ऑनलाईन कविकट्टा समूह, नांदेड व मूकनायक वाचनालय, मांजरम यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना युवा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा माझा नांदेड लाईव्हचे संपादक बबलू शेख बारुळकर यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त आयोजित भव्य कवी संमेलन व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते माझा नांदेड लाईव्हचे संपादक बबलू शेख बारुळकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जि.प.सदस्या डॉ.सौ.मीनलताई पाटील खतगावकर, मारोतराव कवळे गुरुजी, प्रणिताताई देवरे-चिखलीकर, दै. लोकशाशनचे संपादक श्रीराम क्षीरसागर,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नरंगले, भोकरचे भाजप तालुकाध्यक्ष किशोर पाटील लघळूदकर, माधवदादा वाघमारे, पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, माजी आ.रोहिदास चव्हाण, अॅड.मारोती पंढरे, प्रा.डॉ.गंगाधर तोगरे, पत्रकार मिर्झा जमीर बेग, स्वच्छतादूत राजेश्‍वर कांबळे, श्रीगणेश कृषी सेवा केंद्रांचे संचालक माधव मिसे, गुलाब पाटील सोमठानकर, विनोद पापीनवार, नारायण कुंभारे, शहाजी पाटील शिंदे, नितीन कोकाटे,श्रीपत पाटील शिंदे, आदींनी अभिनंदन केले आहे.