Home यवतमाळ जांब मतदान केंद्राध्यक्षाचा केंद्रातच दारू पिऊन गोंधळ..

जांब मतदान केंद्राध्यक्षाचा केंद्रातच दारू पिऊन गोंधळ..

72
चंद्रपूर – आर्णी लोकसभा निवडणुकीत घाटंजी तालुक्यातील प्रकार.
निवडणूक कार्यात हयगय व दारूबंदी कायद्या अंतर्गत पारवा पोलिसात गुन्हा दाखल.
घाटंजी – पहिल्या टप्प्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत चंद्रपूर-आर्णी लोकसभेचा समावेश असल्याने दिनांक १९ एप्रिल रोज शुक्रवारला मतदान पार पडले.यात घाटंजी तालुक्यातील जांब येथिल मतदान केंद्रात नेमून दिलेले खुद्द मतदान केंद्राध्यक्ष जाबुवंत चौरे यांनी दारू पिऊन गोंधळ घातल्याने प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत त्यांना हटवून दुसरे मतदान केंद्राध्यक्ष यांची नेमणूक केली व चौरे यांची वैद्यकीय तपासणी करून निवडणूक कार्यात हयगय व दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्रकार घडला आहे.
लोकसभा निवडणुकीची लगबग असलेल्या पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर – आर्णी लोकसभा निवडणुकीचे मतदान १९ एप्रिल रोज शुक्रवारला जांब येथिल जिल्हा परिषद शाळेतील केंद्रात सकाळी ७ वाजता सुरू झाले.यात नेमून दिलेले केंद्राध्यक्ष यांनी रात्री दरम्यानचे नाईट हाप पँट व टी शर्ट परिधान करून होते.पण बाहेर गाववरून आलेले अधिकारी असल्याने गावकऱ्यांनी दुर्लक्ष केले.मात्र हे महाशय खुर्चीवर न बसता आपले कर्तव्य सोडून वारंवार बाहेर जाणे आत येणे असे करू लागले.गावकऱ्यांनी बराच वेळ हा त्यांचा गंभीर प्रकार अनुभवला अखेर गावातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद जावेद सय्यद अमिर,सरपंच रमेश सिडाम, माजी सरपंच ओंकार कुळसंगे यांनी मंडळ अधिकारी येरकार यांना फोनद्वारे येथिल प्रकार सांगितला.घटनेची गंभीरता बघून घाटंजी तहसीलदार विजय साळवे, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप नरसाळे जांब येथिल मतदान केंद्रात येवून चौरे यांच्या ठिकाणी दुसरे मतदान केंद्राध्यक्ष यांची नेमणूक करून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेवून गेले.यात ते मद्यप्राशन करून असल्याचे आढळले यावरून निवडणूक कार्यात हयगय व सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणे वरून दारूबंदी कायद्या अंतर्गत पारवा पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.येथिल निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी म्हणून तहसीलदार विजय साळवे मतदान संपेपर्यंत केंद्रावर हजर राहिल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सामाजिक कार्यकर्ते सय्यद जावेद सय्यद अमिर यांनी कळविले आहे.