11 जून 2024 रोजी खालापूर तहसील कार्यालयासमोर आपच्या वतीने लाक्षणिक उपोषण…
खोपोली…
खालापूर तालुका हा औद्योगिक दृष्ट्या प्रबळ मानला जातो.परंतु या ठिकाणी महावितरणची वीज ही वारंवार खंडित होत असल्याने होणाऱ्या नुकसानीची कदाचित भरपाई न होणारी बाब आहे.मोडकळीस आलेले भंगार, सामुग्री, विद्युत पोल, ट्रान्सफॉर्मर,केबल, सद्य स्थितीतील सब स्टेशन खराब दर्जाचे असल्यानेअसंख्य वेळा वीज खंडित होवून नुकसान होत आहे.
सध्याचे वाढलेले वीज बिल,वेळोवेळी अनेक नागरिकांना दिली जाणारी अयोग्य बिले,वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे खालापूर तालुक्यातील व्यापारी व जनता मानसिक व आर्थिक तोट्याने त्रस्त आहे.
प्रगत तंत्रज्ञान न वापरणे,Capacity न वाढविणे,तालुक्यात भरमसाठ होणारे शहरीकरण याचा विचार न केल्याने होणारी तिसरी मुंबई कदाचित अंधारात असावी असे दिसत आहे.
ज्या शहराने देशामध्ये विजेचे प्रकल्प राबवून नाव लौकीक केलेले आहे.देशाची आर्थिक राजधानी मुंबई, ज्या शहराच्या वीजपुरवठा वरती प्रगती करीत आहे त्या शहराची दयनीय अवस्था होत आहे.
खालापूर तालुक्याचे उज्ज्वल भविष्य करण्यासाठी या भीषण वीज संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना तसेच पुढील 10 वर्षाचे नियोजन यावर लेखी तांत्रिक माहिती द्यावी यासाठी
प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी खालापूर तहसील कार्यालयासमोर सकाळी 10.00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत आपच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
शहर व तालुक्याचे नुकसान यातून नक्कीच देशाचेही नुकसान होत आहे.विजेच्या समस्येने भविष्यात जन जीवन विस्कळीत होईल असे असताना अधिकारी वर्ग केवळ चालढकल करीत असून यावर ठोस तोडगा न काढल्यास आपच्या वतीने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल तसेच संपूर्ण तालुक्यात विविध घटकांना सोबत घेवुन जनआंदोलनाच्या माध्यमातून तोडगा काढुया असे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी सांगितले आहे.