Home यवतमाळ रविवारी सुरचक्षु स्वरयात्रा संगीत संध्या , “श्रमसंस्कार २०२४ पुरस्काराचे वितरण”

रविवारी सुरचक्षु स्वरयात्रा संगीत संध्या , “श्रमसंस्कार २०२४ पुरस्काराचे वितरण”

40

एस एल फाउंडेशनचा उपक्रम

यवतमाळ (प्रतिनिधी) दाते काँलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या एस एल फाउंडेशनतर्फे रविवारी ९ जुनला सुरचक्षु स्वरयात्रा या संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. दाते काँलेजमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रिय माजी प्राचार्य स्व. सु. ल. देशपांडे सरांच्या ८५ व्या जयंतीच्या निमीत्त हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी संस्थेतर्फे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवाकार्य करणाऱ्यांना देण्यात येणारा श्रमसंस्कार २०२४ हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग संघ, यवतमाळचे सचिव सदानंद तायडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
प्रयास संस्थेचे अध्यक्ष डाँ विजय कावलकर यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार असुन अध्यक्षस्थानी वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव दाते असणार आहेत. सोहळ्यास प्रज्ञाताई कुळकर्णी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या सेवाभावी उपक्रमाला तसेच संगीत संध्येला सामाजिक संस्था, संघटनांनी तसेच संगीत स्नेही व इच्छुकांनी आवर्जुन उपस्थित राहावयाचे आवाहन एस एल फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.