घनसावंगी /लक्ष्मण बिलोरे
– मराठा आरक्षण संदर्भात राज्यसरकार समाजाच्या भावनांशी खेळ खेळत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात ठोस भूमिका घेत नसुन आरक्षण प्रश्नावर तळ्यातमळ्यात असे राजकारण करत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मराठायोद्धा जरांगे पाटील यांनी जीवाची पर्वा न करता आमरण उपोषण केले परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने समाजाने लोकसभा निवडणुकीत आरक्षण विरोधी नेत्यांना धूळ चारली….
आता विधानसभा निवडणुकीत आरक्षण विरोधी नेत्यांना चांगलाच दणका बसणार असा सुचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्यसरकारला दिला आहे. मराठा समाजाला सग्यासोयऱ्यांचे आणि ओबिसी मधून आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली मराठी येथे ८ जून पासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.
सोमवारी अंतरवाली मराठी येथे उपोषण स्थळी झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी ‘राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात गांभिर्याने विचार करून निर्णय घ्यावा,सग्यासोयऱ्यांचे आणि ओबिसी मधून समाजाला आरक्षण द्यावे यासाठी तातडिने कार्यवाही केली पाहिजे.मराठ्यांना मरेपर्यंत आरक्षणाची अपेक्षा सरकारकडून राहणार आहे. उपोषणाच्या काळातच राज्यसरकारने समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात.नसता सरकारने मराठा आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास समाजाचा रोष सरकारला परवडणार नाही’. असा इशारा जरांगे यांनी दिला.