Home औरंगाबाद रिल्स बनवण्याच्या नांदात तरुणी कार सह दरीत पडली ,

रिल्स बनवण्याच्या नांदात तरुणी कार सह दरीत पडली ,

97

 

 

अमीन शाह

औरंगाबाद

खुलताबाद तालुक्यातील
सुलीभंजन दत्तधाम मंदिर परिसरात मोबाईलवर रिल्स बनविणाऱ्या युवतीला आपला प्राण गमवावा लागला,तो कार दरीत कोसळल्याने,सदरील घटना सोमवारी (दि.17) सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली ,या घटनेतील मयत युवतीचे नांव श्वेता दिपक सुरवसे वय 23 वर्षे रा.हनुमाननगर, औरंगाबाद असे आहे.या बाबत अधिक सविस्तर माहिती अशी श्वेता व तिचा मित्र सुरज संजय मुळे वय 25 रा.हनुमान नगर हे औरंगाबाद येथुन टोयाटो इटिऑस गाडी क्रमांक एम.एच.21,बी.एच.0958 ने खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले,या ठिकाणी मोबाईल वर रिल्स बनवितांना तिने. मित्राला सांगितले की मी पण कार चालवुन बघते,रिव्हर्स गिअर पायाचा पडुन,एक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन अंदाजी ३०० फुट खाली पडून गाडीचा चक्काचूर झाले असून यात या युवतीचा मृत्यु झाला.
सुलीभंजन येथील दत्त मंदिराराचा परिसर विहंगम असुन,पावसाळ्यात तो निसर्ग सोंदर्यांने अधिक खुलतो त्यामुळे भाविक ,पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात,अशातच हे दोघेजण गुरुवारी (ता.17) फिरायला आले,मोबाईलवर रिल्स बनवित असतांना घात झाला,मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तर ही घटना.घडली नसती ,