Home वाशिम जखमी वानराला बचाव पथकाकडुन जीवदान

जखमी वानराला बचाव पथकाकडुन जीवदान

37

फुलचंद भगत

वाशिम:-मानोरा तालुक्यातील साखरडोह येथे अज्ञात वाहनाने धडक देवुन एका वानराला जखमी केल्याची माहीती गोपाल इंगळे यांनी मंगरूळपीर शाखेच्या संत गाडगेबाबा आपत्ती व बचाव पथकाला दिली. बचाव पथकाचे अतुल उमाळे गोपाल गिरे लखन खोडे गोपाल गिरी यांनी लगेच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणी वानराला मंगरुळपीर येथील सरकारी पशुवैद्दकीय दवाखान्यात आणुन येथील डाॅक्टरच्या मदतीने ऊपचार केले,वनविभागाचे सुदर्शन सोनोने यांच्या स्वाधीन करुन पुर्ण बरे झाल्यानंतर सदर वानराला निसर्ग अधिवासात सोडल्या जाणार असल्याचे वनभिगाने सांगीतले.