तीन महिने राबविणार उपक्रम…
यवतमाळ – महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हा यवतमाळ तसेच पश्चिम विदर्भातील माननीय राज साहेब ठाकरे यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या निष्ठावंत महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम विदर्भात दिनांक 14 जून रोजी राजसाहेब ठाकरे यांच्या 56 व्या वाढदिवसाच्या अनुषंगाने पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील 56 तालुक्यात 56 हजार झाडांचे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील निष्ठावंत राज समर्थक हा उपक्रम जिल्ह्यात राबवणार आहेत. हा उपक्रम सलग तीन महिने राबविण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून यवतमाळ, दारव्हा येथे पहिल्या टप्प्यात या दोन्ही तालुक्यात 250 झाडांचे वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. दारव्हा तालुक्यातील जागृत देवस्थान तपोनेश्वर व आजूबाजूच्या परिसरात हा उपक्रम ज्यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे, मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वास्तविकतेत आणि पाणीटंचाईच संकट लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज झालेली आहे, कारण एकट्या पश्चिम विदर्भात 2269 गावे ही भीषण पाणीटंचाईग्रस्त आहेत. हे चित्र पुन्हा विदारक होऊ नये म्हणून दूरदृष्टी असलेल्या माननिय राज साहेब ठाकरे ह्या नेत्याच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यवतमाळ शहरातील प्रजापती नगर, साई मंदिर परिसर, वडगाव, मासोळी, मोहा, नवीन भाजी मार्केट परिसर, संदीप टॉकीज या भागात हा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम राबवत असताना शाळा,महाविद्यालय, आश्रम शाळा,मंदिराचा परिसर,तसेच ज्या मैदानांना कुंपण आहे अशा ठिकाणी हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. जेणेकरून वृक्षारोपण हे नुसते फोटो पुरते न करता वास्तविकतेत ते झाड जगले पाहिजे त्याची काळजी घेता येईल. मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत पाचही जिल्ह्यातील भारतीय विद्यार्थी सेनेपासून माननीय राज साहेब ठाकरेंवर आजपर्यंत जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा या मोहिमेत समावेश असणार आहे. या वृक्षारोपण मोहिमेत गोपाल घोडमारे, लकी छांगानी, शिवम नांदुरकर,शुभम संजय राठोड, चेतन अशोकराव खंदार,भावेश विलास कारमोरे, सौरभ अनसिंगकर, आशिष सरूळकर, नीरज देशपांडे, अरुण खंडाळकर यासह इतर मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.