काँपीमुक्त अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांचे प्रतिपादन…!!
अंढेरा – प्रतिनिधी
बुलठाणा , दि. ०७ :- बहुजन पञकार संघ देऊळगाव राजाच्या वतिने काँपीमुक्त अभियान या वर्षी राबविण्यात आले,त्या कार्यक्रमाचा समारोप हा स्थानिक अंढेरा येथील श्री.औन्ढेश्वर महाविघालय अंढेरा पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे हे होते.तर प्रमुख उपस्थीतीमध्ये प्रा.दिलीप सानप,बहूजन पञकार संघाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील शिंदे हे होते.
यावेळी ठाणेदार यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.काँपीमुक्ती ही काळाची गरज असुन विद्यार्थ्यांनी काँपीला बळी न पडता स्वताहा कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करुन परिक्षेत पास व्हावे.विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा मार्ग आपोआपच मोकळा होतो.विद्यार्थ्यांचे भविष्य हे विद्यार्थ्यांच्या हातातच आहे.पालकांनी सुध्दा आपल्या पाल्याला काँपी न करता कमी मार्कस मिळाले तरी चालेल परंतु काँपीला हद्दपार करावे.असे प्रतिपादन नरेंद्र ठाकरे यांनी केले.
प्रा.दिलीप सानप सरांनी आपल्या भाषणात विद्यार्थी वर्गाला परिक्षेसाठी नियमीत अभ्यास करुन नियमीत सराव करावा.यश तुमच्या हातात आहे.तसेच२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी परिक्षेत कुठल्याच प्रकारे चुकीच्या पध्दतीने वागणार नसल्यांची प्रतिज्ञा घेतलेली असुन परिक्षा सुध्दा शांततेत पार पडणार असल्याचे सांगितले.
बहुजन पञकार संघाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील शिंदे यांनी काँपी ही विद्यार्थी वर्गाला लागलेली किड असुन काँपीने पास झालेला विद्यार्थी हा पुढे काहीच करु शकत नाही.तसेच विद्यार्थ्यांनी दररोज तिन ते चार तासच अभ्यास केल्यास परिक्षेत चांगले टक्केवारी मिळु शकते.तसेच येणाऱ्या परिक्षेत मिरीट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुजन पञकार संघ देऊळगाव राजा कडुन प्रशस्ती पञ देऊन गौरविण्यात येईल!
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पञकार ज्ञानेश्वर म्हस्के,पञकार राधेश्याम ढाकणे,पञकार हनिफ शेख,यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा.राजेश्वर पाटील तर आभार प्रदर्शन हुसे सरांनी केले.यावेळी चेके सर,वनवे सर, मुख्याध्यापक सुनील राठोड डोईफोडे घुगे ,आडे सर,झिने पोलीस उपस्थीत होते.