Home जळगाव ४१ व्या दिवशी साखळी उपोषण सुरूच , “जुना मेहरुन परिसरातील पुरुष...

४१ व्या दिवशी साखळी उपोषण सुरूच , “जुना मेहरुन परिसरातील पुरुष व महिलांचा सक्रिय सहभाग”

196

शरीफ शेख

रावेर , दि. ०७ :- जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याला तसेच एन आर सी व एन पी आर याला विरोध म्हणून जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा गुरुवार हा एकेचाळीसावा दिवस होता यादिवशी जुना मेहरुण परिसरातील पुरुष व महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपला निषेध नोंदविला.

*४१ व्या दिवशी यांनी केले मार्गदर्शन*

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी राष्ट्रवादी अध्यक्ष वाल्मीक पाटील, अजय सोनवणे, संभाजी बिग्रेडचे संजय मराठे, रोहिदास पाटील, करीम सालार, फारुक शेख ,उज्वल आर पाटील, शरीफ शाह बापू ,हमीद जनाब, अश्फाक पिंजारी, पुरुषोत्तम चौधरी, अल्ताफ शेख यांनी मार्गदर्शन केले तर रवींद्र भैय्या पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी, विनोद देशमुख मराठा क्रांती दल, राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर येथील पत्रकार आबिद शेख,नूर खा पठाण जामनेर येथील पत्रकार इमरान खान व साजिद नसीम खान यांची विशेष उपस्थिती लाभली.

*डेपोटी सचिव यांना दिले निवेदन*

भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष असलम खान आलम खान यांच्या नेतृत्वात शेख शब्बीर नथू,
पिरजादे रेहान , पीरज़ादा खालीद, आफताब शेख, परिदा बी शेख, आयेशा अख्तर ,फातेमा मुस्ताक, मेहमुदा दादामिया व फर्जाना शेख सलीम यांनी डेपोटी सचिव सुर्यवंशी यांना निवेदन दिले.