Home बुलडाणा बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस वीज पडून महिलेचा मृत्यू ,

बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस वीज पडून महिलेचा मृत्यू ,

47

 

 

अमीन शाह

बुलढाणा

अनेक दिवसांच्या उसंतीनंतर मलकापूर तालुक्यात मुसळधार पावसाने वादळी वाऱ्यासह सर्वदूर हजेरी लावली. यामुळे लाखावर शेतकरी सुखावले असतानाच विजेच्या तांडवाने देखील थैमान घातले.वीज अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली.तसेच वीज पडून एका बैल दगावला आहे.

आज रविवारी १८ ऑगस्ट रोजी मलकापूर तालुक्यात दुपारी मुसळधार पावसाने सर्व दूर दमदार हजेरी लावली. मलकापूर शहर परिसर आणि तालुक्यातील अनेक गावांत पाऊण ते एक तास धुवांधार पाऊस बरसला. तालुक्यातील म्हैसवाडी, विवरा गाव आणि शेत शिवारात पावसाचा आवेग जास्त होता . पुष्पा प्रभाकर राणे (वय ५६ वर्ष, राहणार म्हैस वाडी, तालुका मलकापूर) यांचे म्हैसवाडी शिवारात शेत आहे. त्या आणि म्हैसवाडी गावातीलच योगिता विनोद किनगे (वय ४५ वर्ष) या दोघी शेतात काम करीत होत्या. यावेळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊण ते एक तास मुसळधार पाऊस बरसला. दरम्यान अचानक वीजेचा लोळ अंगावर कोसळून पुष्पा राणे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबतच्या सहकारी महिला योगिता किनगे या सुदैवाने बचावल्या असल्या तरी गंभीर रित्या जखमी झाल्या आहे. विजेचे हे तांडव शेजारीच शेत असलेल्या चेतन पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने म्हैसवाडी चे पोलीस पाटील योगेश पाटील यांना भ्रमणध्वनी वरून या दुर्दैवी घटने संदर्भात माहिती दिली. योगेश पाटील यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत तहसीलदार राहुल तायडे, मंडळ अधिकारी वानखेडे, तलाठी कौशल महाजन व दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांना भ्रमणध्वनी वरून सदर घटनेची माहिती दिली. केली.