फुलचंद भगत
वाशिम:-मालेगांव येथील सराफा व्यावसायिकावर झालेल्या लुटीच्या हल्यात एका कारागीराचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी नागपूरच्या दवाखान्यातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे.सदर आरोपीला पकडण्यासाठी पोलीसांची पथके रवाना करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये दि. 22 डिसेंबर 2021 रोजी एक सराफा व्यावसायिक दुकान बंद करून घरी जाताना पाळत ठेवून असलेल्या अज्ञातांनी लुटीच्या उद्देशाने टाकलेल्या दरोड्यात गोळीबार प्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 522/2021 कलम 396 397, 120 (B) भा.द.वी. सह के 3/25 आर्म ऍक्ट नुसार गुन्हाची नोंद झाली होती.गुन्ह्याच्या तपासा दरम्यान 5 आरोपींना अटक झाली होती आजाबराव बबनराव घुगे रा. सुकांडा, दिनेश किसनभाई मिरापुरे रा. अहंमदाबाद गुजरात, संतोष दत्तात्रय माने रा. सातारा, हुसेन उर्फ हसन सलीम खाटीक रा. अकोट हितेस उर्फ सिताराम भाटीया रा. अहमदाबाद यांना मालेगांव पोलीसांनी अटक केली होती. सदर आरोपी विरुद्ध वाशिम येथील सेशन कोर्टात अंडरड्रायल केस सुरु होती. सदर गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार यांचे बयान झाले होते. काही साक्षीदाराचे बयान बाकी होते .यातील आरोपी दिनेश किसनभाई मिरापुरे,वय 45 वर्ष अहमदाबाद, गुजरात यास वाशिम कारागृहातून मेडीकल चेक अप साठी दि.12/8/24 ला नेले होते.तेथे नागपुर हॉस्पीटलमध्ये असतांना तेथून आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देउन फरार झाला आहे. या वरून सदर आरोपी विरुद्ध पो.स्टे. अजनी नागपुर येथे अ.प क्र. 460/2024 कलम 262 B.N.S (भारतीय न्याय संहीता 2023) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपीचा पोलीस अधीक्षक वाशिम यांनी पथक नेमून तात्काळ अटक करावी अशी मागणी मालेगाव येथील सुवर्ण व्यावसायीकांनी केली आहे. या प्रकरणी वरीष्ठ पोलिस अधिकारी काय कार्यवाही करतात या कडे संपूर्ण वाशीम जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.