Home यवतमाळ हिंदूंचा आक्रोश भर पावसामध्ये मूक मोर्चा हजारोच्या संख्येने करण्यात आला

हिंदूंचा आक्रोश भर पावसामध्ये मूक मोर्चा हजारोच्या संख्येने करण्यात आला

23

यवतमाळ – आज शनिवार रोजी यवतमाळ येथील सकल हिंदू समाजाने बांगलादेश मधील हिंदू वर होत असलेल्या हिंसेबाबत बंद पुकारण्यात आला असून यवतमाळ मधील यवतमाळ ऑटो युनियन, कामगार युनियन, मोक्षधाम सेवा समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यवतमाळ, व्यापारी संघटना, साई पॉइंट चालक-मालक संघटना, शिक्षक महासंघ, केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना, शिवप्रतिष्ठान, किराणा मर्चंट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शहरातील समस्त दुर्गा उत्सव व गणेशोत्सव मंडळ, इस्कॉन परिवार अशा अनेक संघटनांनी त्याला पाठिंबा देण्यात आला त्यामुळे काल यवतमाळ शहर कडकडीचे बंद ठेवण्यात आले होते सकाळी 11 वाजता भर पावसात हजारोंच्या संख्येने हिंदू मुली महिला व पुरुष एकत्र येऊन विशाल मोर्चा काढण्यात आला मोर्चा शहरातील विविध भागातून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला विश्व हिंदू परिषदेचे गोविंद मोर ज्योतीताई चव्हाण प्रदीप वडनेरकर अर्जुन खर्चे ,अजय चमेंड़िया,सचिन तुरकर अजिंदर चावला,गौरव सूचक,मनीष बिसेन आकांक्षा वर्मा व भारती जानी,सौ धनेवार ,राजू निमोदीया ,राजू खंडारकर,योगिन तिवारी, मनोज औदार्य,चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व विविध संघटनेचे प्रमुख माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी श्री राम लोखंडे व अजय मुंदडा व राजेश्वर निवल यांनी आपल्या उदबोधनामध्ये हिंदू विरोधकांना आवाहन केले की आता हिंदू वर होणाऱ्या अत्याचार हिंदू सहन करून घेणार नाही भविष्यात कधी अशी वेळ निर्माण झाल्यास यवतमाळातील समस्त हिंदू समाज हिंदू विरोधकांना आळा घातल्याशिवाय राहणार नाही.