Home बुलडाणा पत्रकारांशी उद्धट भाषेत बोलणाऱ्या ठाणेदार करेवाड यांचेवर कारवाई करण्यासाठी पत्रकारांची जिल्हा पोलीस...

पत्रकारांशी उद्धट भाषेत बोलणाऱ्या ठाणेदार करेवाड यांचेवर कारवाई करण्यासाठी पत्रकारांची जिल्हा पोलीस अधीक्षककडे मागणी

39

 

 

बुलडाणा
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शांतता समितीच्या बैठकीमध्ये साखरखेर्डा ठाणेदारांनी पत्रकाराशी अरेरावी आणि उद्ठपणाची भाषा वापरून अपमानित केले यासंदर्भात तात्काळ चौकशी करून ठाणेदार करेवाड यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सिंदखेडराजा तालुक्यातील पत्रकार संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे
या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की. 06 सप्टेंबर रोजी मलकापूर पांग्रा तालुका सिं.राजा येथे ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी साखरखेर्डा पो.स्टे.चे ठाणेदार गजानन करेवाड यांनी त्या ठिकाणी चर्चा करतांना चे पत्रकार फकीरा पठाण यांना एकेरी संबोधून अत्यंत खालच्या पातळीवर अरेरावीची आणि उद्धटपणाची भाषा वापरून गावातील व्यक्तींसमोर अपमानीत केले. यासंदर्भात पत्रकारांनी त्यांच्याशी तुमचं हे बोलणं बरोबर नव्हतं असे सांगीतले असता त्यांनी आमचे म्हणणे न ऐकता, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या व मी तकारीला घाबरत नाही असे सांगितले त्यामुळे सदर ठाणे दारावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार दीपक नागरे भगवान साळवे वसीम शेख कासिम शेख सचिन खंडारे विठ्ठल देशमुख बाजीराव वाघ समीर कुरेशी वसीम शेख अमोल साळवे पवन मगर रमेश कोंडाणे गुलशेर शेख इसाक कुरेशी गजानन काळुसे फिरोज शेख भगवान नागरे अशोक इंगळे गणेश पंजरकर अफरोज शेख यांनी केली आहे