Home यवतमाळ गोदावरी अर्बन “सहकारभूषण”पुरस्काराने सन्मानित….!

गोदावरी अर्बन “सहकारभूषण”पुरस्काराने सन्मानित….!

25
 यवतमाळ – गोदावरी अर्बनने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमध्ये सहकार रुजविण्यात व वाढविण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल नॅशनल मल्टिस्टेट फेडरेशनच्या वतीने गोदावरी अर्बनला ‘सहकारभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार केंद्रीय सहकार सचिव डॉ. आशिष भूतानी, माजी सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख, सहकार सह निबंधक संभाजीराव निकम, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे उपस्थितीत पुरस्कार स्वीकारला. यावेळी मल्टिस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पुरस्कार सोहळ्यात रवी इंगळे, महेश केंद्रे, वणी शाखा व्यवस्थापक विजय मोडक व अधिकारी उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन नॅशनल मल्टिस्टेट फेडरेशनच्या वतीने सहकार भवन शिर्डी येथे करण्यात आले होते. या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे संशोधन केंद्राचे अध्यक्ष मा. खा. हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, समस्त संचालक, ग्राहक व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी वर्धा शाखेचे व्यवस्थापक चंद्रशेखर कामडी, गजानन सूर्यवंशी, एकनाथ विभुते, अतिश कोमटवार, कुंदन वेले, गोपाल खोडके, सोमेश संगेवार, कुरुंदा, गोपीराज दळवे, गजानन पाटील, निखिल जुराफे आदी उपस्थित होते.