Home बुलडाणा दुसरबीड शिवारातील अवैध मुरूम खोदकामावर दंडात्मक कारवाई ,

दुसरबीड शिवारातील अवैध मुरूम खोदकामावर दंडात्मक कारवाई ,

18

दुसरबीड शिवारातील अवैध मुरूम खोदकामावर दंडात्मक कारवाई

खोदकामाची होणार चौकशी ;पोकलेन, जेसीबी सह ११ ट्रॅक्टर जप्त

अनिल दराडे ,

येथील समृध्दी महामार्गाकडे जाणाऱ्या मलकापुरपांग्रा रोडलगत असलेल्या गट क्रमांक ६०१ मधील जमीनीवर मागील अनेक दिवसांपासून मुरूम उत्खनन सुरू आहे. आज दुपारी सिंदखेडराजा येथे नुकतेच रुजू झालेले तहसिलदार अजित दिवटे यांनी अचानक धाड टाकली. यावेळी संबंधिताकडे मुरूम उत्खननाबाबत कोणताही परवाना आढळून न आल्याने तेथे वाहतूक सुरू असलेले ११ ट्रॅक्टर, १ जेसीबी व पोकलेन ताब्यात घेत किनगावराजा पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आले आहे.
मलकापुरपांग्रा रोडलगत मागील काही महिन्यांपासून सुरू असलेले उत्खनाची गोपनीय माहिती सिंदखेडराजा महसूल विभागाला मिळाल्यानंतर तहसीलदार दिवटे व त्यांच्या पथकाने आज अचानकपणे दहा टाकून गट क्रमांक ६०१ मधील उत्खननाबाबत विचारणा केल्यानंतर कोणतीही परवाना मिळून आला नाही. यामुळे तहसीलदार अजित दिवटे यांनी किनगावराजा पोलीस स्टेशन व महसूल प्रशासनातील आपला फौजफाटा घटनास्थळी उपस्थित करत कारवाईचे संकेत दिले. विशेष म्हणजे तहसीलदार दिवटे यांना तेथे विना नंबर असलेले ट्रॅक्टर दिसून आल्याने पोलीसांचा समाचार घेतला. त्यांनी अंदाजे १ हेक्टर ६० आर जमीनीवर सुरू असलेल्या खोदकामाचा कोणताही परवाना संबंधीताने न दाखविल्याने तेथे मुरूम वाहतूक करत असलेले एकूणच ११ ट्रॅक्टर,१ जेसीबी व पोकलेन जप्त करण्यात आले असून किनगावराजा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे.
यावेळी सिंदखेडराजाचे तहसीलदार अजित दिवटे यांच्या समवेत मंडळ अधिकारी मनसुटे,तलाठी राहुल देशमुख, तलाठी राहेरी जी.एस.टेकाळे, तलाठी जऊळका रविंद्र लांडगे, कोतवाल जयश्री जगताप, पोलीस पाटील दुसरबीड उर्मिला मखमले, संजय आटोळे पथकात उपस्थित होते. वृत्तलेपर्यंत गुन्हा दाखल झाला नसून हजारो ब्रास मुरूम उत्खननाबाबत स्पष्ट अहवाल रात्री उशिरापर्यंत समोर आला नाही.