Home बुलडाणा व्हाट्सअप ग्रुप वर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कारवाईची...

व्हाट्सअप ग्रुप वर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कारवाईची मागणी

19

 

 

फकीरा पठाण ,

मलकापूर पांगरा

व्हाट्सअप ग्रुप वर मुस्लिम समाजाबद्दल अक्षेपाह पोस्ट टाकल्याबद्दल मलकापूर पांग्रा येथील मुस्लिम समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव एकत्र आले होते या घटनेची माहिती मिळतात साखरखेर्डा ठाणेदार गजानन करेवाड आणि बीबी ठाणेदार संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव येऊन जमावाला शांत केले यावेळी समस्त बांधवांनी याप्रकरणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या वर सायबर क्राईम कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशा मागणी चे निवेदन साखरखेर्डा ठाणेदारांना देण्यात आले
या बाबत मिळालेली माहिती अशी की एका व्हाट्सअप ग्रुप वर गणेश कडुबा चव्हाण राहणार झोटिंगा याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट ग्रुप वर टाकल्याने गावातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला दरम्यान या प्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी गावातील मुस्लिम बांधव ग्रामपंचायत पासून पोलीस मदत केंद्रा समोर आले या घटनेची माहिती मिळताच डी वाय एस पी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डाचे ठाणेदार गजानन करेवाड आणि बीबी चे ठाणेदार संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला शांत केले दरम्यान या ठिकाणी जमलेल्यानी ठाणेदारांना निवेदन देऊन या प्रकरणी सायबर क्राईम मार्फत गुन्हा दाखल करावा अशी मागणीचे निवेदन माजी सरपंच साबेर पठाण शेख ताज फैजान बागवान आफताब शेख शहेबाज पठाण सोहेल पटेल वजीर कुरेशी अबरार पठाण शे सिराज नवेद कुरेशी यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवांनी केली दरम्यान घटनास्थळी दंगा काबू पथक दाखल झाले असून सध्या गावात शांतता आहे

प्रशासनाची तत्परता महत्त्वाची ठरली ….

सदर घटनेची माहिती मिळताच डी वाय एस पी प्रदीप पाटील ठाणेदार गजानन करेवाड बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील मलकापूर पांग्रा बीट जामदार निवृत्ती पोफळे सह गावातील व बाहेरगावातील पुढाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने प्रशासनाने वेळीच गणेश चव्हाण यास समज दिली त्याने क्षमा याचना केली मात्र ठाणेदार या प्रकरणी काय भुमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे ,