Home रायगड खोपोलीतील ट्रॅफिकची समस्या न सुटल्यास 02 ऑक्टोबर 2024 पासून बेमुदत आंदोलन…

खोपोलीतील ट्रॅफिकची समस्या न सुटल्यास 02 ऑक्टोबर 2024 पासून बेमुदत आंदोलन…

19

खोपोली खालापूर संघर्ष समिती अभ्यासपूर्ण रीतीने सोडवित आहे शहराच्या समस्या…

शहरातील सर्व स्तरातील जागृत नागरिक संघर्ष समितीला देत आहेत पाठींबा…

खोपोली नगरपालिका हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते दिपक हॉटेल चौक हे वर्दळीचे ठिकाण आहे.येथूनच रेल्वे स्टेशन ते बाजारपेठ सुद्धा ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर असल्याने नागरिक त्रस्त आहेत.परंतु याठिकाणी रस्त्यावर बसणारे फेरीवाले व बाहेरून येणारे व्यावसायिक यामुळे शहरात ट्रॅफिकची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे.खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण विरोधी पथक यांनी याकामी सक्रिय असायला हवे परंतु संपूर्ण शहरात अतिक्रमणाचा विळखा बसून शहर चिंताग्रस्त श्रेणी मध्ये येत आहे.शहरातील या प्रश्नावर लक्ष ठेवून मार्ग काढणे ही प्रशासनाची जबाबदारी असून याकामी खोपोली नगरपालिका प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे.खोपोली खालापूर संघर्ष समितीने यासंदर्भात 02 सप्टेंबर 2024 रोजी पत्रव्यवहार करूनही या समस्येत काहीही फरक पडलेला दिसत नाही.हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करून लवकरात लवकर शहर अतिक्रमण उठण्यासाठी लाक्षणिक प्रयत्न न केल्यास खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून दिनांक O2 ऑक्टोबर 2024 पासुन खोपोली नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करनार आहे.खोपोली खालापुर संघर्ष समितीने पोलीस प्रशासनासोबत या समस्या बाबत चर्चा केली असता ते देखील संयुक्त कारवाईस तयार आहेत.
ही समस्या खोपोली नगर परिषदेने न सोडविल्यास बेमुदत आंदोलन करून ही समस्या मिटवण्यासाठी समाजातील सर्व स्तरांचा पाठिंबा मिळत असून नागरिक या समस्येतून मार्ग निघेल असा आशावाद व्यक्त करीत आहेत.
शहरातील नागरी समस्येमुळे शहराची प्रगती खुंटून सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे.संघर्ष समिती नागरी समस्या सोडविण्यासाठी शहरातील जाणकार मंडळींकडून मार्गदर्शन घेवून लढा देत आहे.हा लढा शहरासाठी क्रांतीचे पावूल असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ही नक्कीच जमेची बाजू आहे असे प्रतिपादन खोपोली खालापूर संघर्ष समितीने व्यक्त केले आहे.