Home यवतमाळ गरबा स्पर्धेत बक्षीसांची लयलूट “महिला-मुलींची गरबा स्पर्धेत धूम”

गरबा स्पर्धेत बक्षीसांची लयलूट “महिला-मुलींची गरबा स्पर्धेत धूम”

6

‍ yavatmal – डॉ.नीरज वाघमारे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी हे दीर्घ काळापासून दरवर्षी नवरात्रीच्या काळात महिला आणि मुलींच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सात दिवस तज्ञ महिला प्रशिक्षका कडून गरब्याचे मोफत प्रशिक्षणवर्ग आयोजित करीत असतात. याही वर्षी आठवडाभर गरबा प्रशिक्षण देऊन दि.१ आक्टोबरला पीपल्स माध्यमिक विद्यालयाच्या भव्य प्रांगणात गरबा स्पर्धा संपन्न झाल्या. शेकडो मुली आणि महिलांच्या सहभागाने वातावरण दणाणून गेले. परिसरातील रोषणाई, उत्कृष्ट संचालन, महिलांचा उदंड प्रतिसाद, आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी, या सर्व बाबींमुळे

या स्पर्धा अतिशय अविस्मरणीय ठरल्या आहेत.
या स्पर्धेत उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केल्याबद्दल वरिष्ठ गटातून प्रथम क्रमांक विजेती अमृता घाडगे- सोन्याची नथ
द्वितीय क्रमांक काजल काळे- पैठणी
तृतीय क्रमांक संस्कृती वाकडे- मोत्याचा हार बक्षीसा दाखल देण्यात आला. आणि प्रोत्साहन पर विजेता म्हणून
चतुर्थ क्रमांक-आरती खोब्रागडे व पाचवा क्रमांक निकिता गडदे. या स्पर्धेकानी पटकावला.
तर लहान वयोगटातून प्रथम क्रमांक- अलंक्रीता वाघमारे-११११रू द्वितीय क्रमांक- स्वरा पाटील-७७७ रू. तृतीय क्रमांक-रुही बिसमोरे-५५५ रू. बक्षीस देण्यात आली तर प्रोत्साहन पर म्हणून चौथा क्रमांक- आर्या शेलारे, पाचवा क्रमांक- स्वरा वाघमारे या मुलींना घोषित करण्यात आले.या स्पर्धेचे मुख्य आयोजक डॉ.नीरज वाघमारे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यवतमाळ हे होते. तर एडवोकेट प्रियदर्शी तेलंग यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डाॅ. नीरज वाघमारे, जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, शहर अध्यक्ष गजानन सावळे, शहर महासचिव, प्रमोद पाटील. महिला महासचिव, पुष्पाताई शिरसाट, अध्यक्ष- शोभनाताई कोटंबे, सचिव-भारती सावते, शहर कोषाध्यक्ष-प्रसेनजीत भवरे, जिल्हा महासचिव पुष्पाताई शिरसाट, शहर महासचिव- रत्नमाला कांबळे, उपाध्यक्ष मिनाताई रणीत, सविता तिडके, निशा निमकर उपस्थित होत्या. मुख्य प्रशिक्षिका मैथिली आंबुलकर ह्या होत्या. तर परीक्षक म्हणून ऋतिक पाटील, राजश्री भोरे यांनी काम पाहिले.