Home जळगाव चक्क तंबाखू साठी युवकाला मारून टाकले ,

चक्क तंबाखू साठी युवकाला मारून टाकले ,

18

चक्क तंबाखू साठी युवकाला मारून टाकले ,

अमीन शाह
जळगाव ,
मध्यरात्री मद्याच्या धुंदीत
दुचाकीवर येवून ओट्यावर झोपलेल्या तरुणाच्या अंगावरील चादर ओढून आम्हाला गाय छाप तंबाखू खायला दे, अशा क्षुल्लक कारणावरून तिघा तरुणांमध्ये बाचाबाची झाली. यात एका तरुणाचा दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आल्याचा उलगडा अडावद पोलिसांनी अवघ्या १२ तासात लावला. या तपासात सीसीटीव्ही फुटेजची महत्वपूर्ण कामगिरी ठरली. या प्रकरणात १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्यास २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन बालकास बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

सध्या लोखंडे नगरमध्ये राहणाऱ्या बापू हरी महाजन उर्फ गरीब (वय २८, मूळ रा. खर्ची, ता. एरंडोल) यांची लाकडी दांडा व दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना १ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली होती. हत्येप्रकरणी पोलिसांनी आडगाव येथील वडगाव रोडवरील खालच्या माळीवाडा राहणाऱ्या संशयित आरोपी राज सुरेश महाजन (वय १९) यास अटक केली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.