Home बुलडाणा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला श्रीमज्जगद्गुरु पलसिध्द महास्वामींचे नाव द्या

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला श्रीमज्जगद्गुरु पलसिध्द महास्वामींचे नाव द्या

31

प्राचार्य फोरमचे सचिव डॉ निलेश गावंडे यांची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी

अमीन शाह

साखरखेर्डा

महाराष्ट्र राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना थोर समाजसुधारकांचे नावे देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे त्या अनुषंगाने सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) यास जगद्गुरू पलसिध्द महास्वामी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव देण्यात अशी मागणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अमरावती परिक्षेत्रिय प्राचार्य फोरमचे सचिव तथा सीनेट सदस्य डॉ निलेश नारायणराव गावंडे यांनी पर्यटन मंत्री मंगल प्रभात ओढा यांचेकडे एका पत्रकान्वये केली आहे.
डॉ गावंडे यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, बुलडाणा जिल्ह्य़ातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे जगद्गुरू पलसिध्द महास्वामींचा मठ आहे, तेथेच महाराजांची समाधी आहे, त्याला आता 966 वर्षे पूर्ण झाली आहे. प्राचीन काळी धौम्य ऋषींच्या तपश्चर्येसाठी हा परिसर प्रसिद्ध होता. खेटकासूर नावाचा राक्षस त्यांच्या यज्ञयागात सतत विघ्ने आणत होता. धौम्य ऋषींनी तपश्चर्येने महालक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेतल्यानंतर तिच्या आदेशानुसार पांडवांपैकी भीमाकडून खेटकासूराचा वध केला.उज्जयिनी सिंहासनाधिश्वर जगद्गुरू मरूळसिध्द शिवाचार्य यांनी यौवनाच्या त्रासाला कंटाळून दक्षिणेकडे अरण्यातील बेल्लारी जिल्ह्य़ात पीठ स्थापले.बिदरला चालूक्य घराण्यातील राजा जयसिंह राज्य करीत होता. त्या काळात प्रचंड दुष्काळ पडला होता दरम्यान ऋषींच्या यज्ञानंतरही काहीही फरक पडला नाही त्यामुळे चिडून जाऊन ऋषींना बंदीवासात टाकले. मात्र शिवाचार्यांना ही माहिती कळताच त्यांनी राजाची कानउघाडणी केली. त्यानंतर राजाने ऋषींमुनींना मुक्त केले. आचार्यांनी तपसामर्थ्याने सतत आठवडाभर पर्जनवृष्टी केली. हा चमत्कार पाहून राजा शरन गेला त्यांनी त्याला पुत्र प्राप्तीचा वर दिला त्यानंतर त्याला पुत्र झाला. चालुक्य सोमेश्वर या नावाने नंतर तो गाजला. शिवाचार्यांना तेव्हा पासून सिध्द प्रभू संबोधन प्राप्त झाले. उत्तर भारतात त्यांनी वीरशैव पंथाचा प्रचार केला.
खेटकपूरच्या परिसरातील वास्तव काळात एक गाय सिध्द प्रभूंना दुग्धपान करू लागली. त्यामुळे गायीचे दूध वाढले. हे पाहून मालकाला आश्चर्य वाटले त्याने शोधघेतला असता ही गाय सिध्द प्रभूंना दुग्धपान करीत असल्याचे त्याला दिसले. गवळ्याने महाराजांना मोबदला मागितला. महाराजांनी तेथील शेण त्याच्या झोळीत टाकले, चिडून जाऊन गवळ्याने शेण फेकून दिले. घरी जाऊन त्याने झोळी झटकताच त्यातून सोन्याचे कण पडले गवळ्याला पश्चाताप झाला तो शिवाचार्याचरणी लिन झाला ही वार्ता वार्यासारखी पसरली. मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करू लागले शिवाचार्यांची तपसामर्थ्य अगाध धर्म ज्ञान, समाजसंघटन, दूरदर्शीपणा, धर्मप्रसार यंत्रणा इतर बाबींचा अभ्यास केल्यावर त्यांची महानता लक्षात येईल.
राजाने शिवाचार्यांची उदभूत शक्ती पाहून राजा अवाक् झाला होता. महाराजांच्या आज्ञेचे पालन करून राज्याने बंदिस्त केलेले सगळे लोक मुक्त करून महाराजांपुढे नेल्यावर महाराजांनी पाऊस पाडला होता. राजाने सर्व राज्य महाराजांचरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. महाराजांनी दिलेल्या गुरूदक्षिणेमुळे राजाला जो पूत्र प्राप्त झाला होता त्याचे नाव सोमेश्वर इ. स. 1040 मध्ये सोमेश्वरने राज्याभिषेक केला. शिवाचार्य पुढे पुढे तीर्थयात्रेला निघाले असताना त्यांनी कावेरी कावेरीच्या तिरावर मठ स्थापना केली. वीरशैव धर्माची पताका त्यांनी भारतभर फडकविली. उज्जयिनी पीठाचे ते साठावे जगद्गुरू होते.
साखरखेर्डा येथे जगद्गुरू पलसिध्द महास्वाजींनी सुमारे एक हजार वर्षापूर्वी म्हणजे 980 इ. स. 1058 मध्ये पळसाच्या झाडाखाली संजीवन समाधी घेतली. मंदिर च्या प्रवेश व्दारावर “श्री जगद्गजगदगुरू परमहंसमरूळाचार्यवर्य श्रीमदभुरूद्रपलसिध्दस्वामिन प्रसिदश्रीमनृप शा. शके 980” ह्या व्दारावर लावलेल्या चांदीने मढवलेल्या पत्र्याखालच्या दगडी शिळेवर हा मजकूर कोरलेला आहे.
जगद्गुरू पलसिध्द महास्वामी योगशास्त्राचे उत्तम अधिकारी होते. संजीवन समाधी जवळ विलक्षण रमणीयता आहे. महास्वामींच्या समाधीचा हा पलशवृक्ष एकहजार वर्षानंतरसुद्धा साक्षीदार आहे. विशेष म्हणजे या वृक्षाला फुले येत नाहीत. महास्वामी समाधीस्त बसले असताना पळसाची त्यांच्या हातात काठी होती ती बसताना त्यांनी जमीनीत खुपसली आणि नंतर तो वृक्ष बहरला असेही सांगण्यात येते. त्याकाळातील नक्षीदार मंदिरे, बारव, भुयारी मार्ग, जाती यासह काही दगडी भांडी येथे आजही बघायला मिळतात. साखरखेर्डा येथील हा मठ उज्जयिनी पीठाचा शाखा मठ आहे.या मठाच्या देशात अडीचशेचे वर उपशाखा असून पाच लाखाचे वर भक्त परिवार आहे. साखरखेर्डा येथे स्मृती महोत्सव, गुरूपोर्णिमा, श्रावणमास उत्सव अशी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते ज्या मध्ये रक्तदान शिबीर, धर्म सभा, मोफत आरोग्य शिबीर, याबरोबरच लहान मुलांना मोफत पाठशाळा चालविली जाते. “श्री मज्जगदगुरू पलसिध्देश्वर शिवाचार्य भगवदपाद” असा उल्लेख आहे. साखरखेर्डा येथील समाधी काळ (इ.स.1058)शके 980 ला महाराजांनी संजिवनी समाधी घेतली साखर खेर्डा सह संपुर्ण राज्यात विविध प्रकारे सामाजिक कार्य संस्थान तर्फे केल्या जातात..
शिवसंत लक्ष्मण महाराज यांनी वयाच्या 29 व्या वर्षी साखरखेर्डा मठात शके 1759 इ. स. 1837 साधना केली. त्यांना अफाट प्रतिभा प्राप्त झाली त्यांनी जवळपास पाचहजाराहून अधिक अभंग रचना केल्या आहेत .येथिल उत्सव हा श्रावण कृ.3.4.5 , रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो धार्मिक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याची कीर्ती महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश.आंध्र प्रदेश, तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये पसरली आहे त्यांनी केलेले कार्य महान आहे तसेच समाजप्रबोधन अध्यात्मिक, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, रक्तदान, अवयवदान या कार्यात सक्रिय योगदान देऊन राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे.
आमच्या भागातील अशा या महान महापुरुषाचे नाव सिंदखेडराजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी.आय) यास देऊन त्यांना सन्मानित करावे
डॉ निलेश नारायणराव गावंडे यांनी केली आहे.