Home बुलडाणा शेतात शेळया चारणाऱ्या झोपडीत राहणाऱ्या जावेद शाह चे सतरा लाख फॉलोवर्स.!

शेतात शेळया चारणाऱ्या झोपडीत राहणाऱ्या जावेद शाह चे सतरा लाख फॉलोवर्स.!

27

 

युवकांना देतो युट्यूब,इंस्टाग्राम वर फिटनेस चे धडे.

Javed_fitness786 या नावाने इंस्टाग्राम अकाउंट वर 10 लाख फॉलोवर्स ,

@Javedfitness786 या यूट्यूब अकाउंट वर 17 लाख सब्सक्राइबर्स

 

अमीन शाह

बुलडाणा ,
आरोग्य हीच खरी संपत्ती व सुदृढ आरोग्यासाठी श्रीमंती असणे आवश्यक नाही त्यासाठी पाहिजे जिद्द व कष्टाची तयारी.
बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे राहणारा जावेद शाह मूळचा अकोला जिल्ह्यातील.
घरची परस्थिती हलाखीची असल्याने युवक आपल्या कुटुंबीयांसोबत टीनपत्राच्या रूम मध्ये भाड्याने राहतो.
ग्रामीण भागात रोजगार म्हणून विशेष काही नसल्याने घरच्या चार पाच शेळ्या जंगलात चारण्यासाठी घेऊन जाणे व गावात मिळेल ते मोल मजुरीचे काम करणे अश्या संघर्षमय जीवनात
अनुकूल परस्थिती नसतांना फिटनेस ची आवड असलेला परंतु जिम मध्ये फी देण्याची क्षमता नसल्याने जावेद ने भंगार मधील टाकाऊ साहित्याच्या साह्याने आपल्या घरातील टिन पत्राच्या खोलीतच जिम तयार केले.
फिटनेस कडे लक्ष देत असतांना सोशल मीडिया द्वारे तरूणांना फिटनेस चे धडे देणे व त्यांना सुदृढ आरोग्याकडे आकर्षित करण्यासाठी जावेद ने युट्यूब,इंस्टाग्राम वर फिटनेस च क्लास सुरू केला आहे पाहता पाहता त्याचे लाखो फ्लॉवर्स जुळले आहे , मला जर आर्थिक मदत मिळाली तर एक जिम सुरू करून युवकांना शरीर यष्टी मजबूत करण्याचे धडे देण्याचा त्याचा स्वप्न आहे झोपडीत राहून रानात शेळ्या चारून सोशल मीडिया वर लाखो फालॉवर्स मिळवणारा तो बुलडाणा जिल्यातील एकमेव तरुण आहे ,