Home यवतमाळ शिवसेना (उबाठा) गटाची तिकीट कुणाला: नवख्या उमेदवाराला की माजी आमदाराला…!

शिवसेना (उबाठा) गटाची तिकीट कुणाला: नवख्या उमेदवाराला की माजी आमदाराला…!

11

यवतमाळ / वणी – वणी: विधानसभेची आचार संहिता लावकरच लागणार आहे. आणि वणी विधानसभेत शिवसेनेत उमेदवारीवरून मिळवीण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. या धडपडीत विधानसभेचे शिवसेना (उबाठा) गटाचे तिकीट कुणाला मिळणार नवख्या उमेदवारास की माजी आमदाराला याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

माजी आमदार विश्वास नांदेकर हे वणी विधानसभेचे 2004 ते 2009 या काळात शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच पक्षाशी गेल्या अनेक दशकापासून एकनिष्ठ राहिले आहे. एक उत्तम शिवसैनिक म्हणून त्यांची विधानसभा क्षेत्रात ओळख आहे. 2024 मध्ये महाविकास आघाडीची सीट शिवसेनेला मिळणार असल्याची चर्चा रंगत आहे. इतक्या दशकापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या विश्वास नांदेकर यांना तिकीट मिळावी म्हणून शिवसैनिक नांदेकर यांच्या पाठीशी उभे आहेत. एकूण विचार करता विश्वास नांदेकर हे वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उबाठा) गटाचे प्रबळ दावेदार आहे. परंतु या दावेदाराला तिकीट न मिळू देण्याची चाल नव्याने पक्षात दाखल झालेल्या संजय देरकर यांनी चालवीला आहे. संजय देरकर हे 1999 राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली. परंतु यावेळी त्यांना वामनराव कासावार यांनी मात दिली व वणी विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा रोवला. तर 2004 मध्ये त्यांनी सेनेला पाठिंबा दिला. व यावेळी विश्वास नांदेकर आमदार म्हणून विधासभेवर निवडून आले. 2009 मध्ये संजय देरकर यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस यांची युती असल्याने त्यांना पक्षाने सीट नाकारली. ही सीट काँग्रेसला वाट्याला गेली. त्यामुळे नाराज झालेल्या संजय देरकर यांनी पक्षाला रामराम ठोकला व पक्षश्रेष्ठीशी बंडखोरी करून अपक्ष म्हणून लढले. यावेळी त्यांना पराभवच चाखावा लागला. त्यानंतर 2014 मध्ये संजय देरकरला यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेतले व राष्ट्रवादी पक्षाकडून विधानसभा लढले. परंतु यावेळी त्यांच्या गळ्यात परावभावाची माळ पडली. पुन्हा 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्याशी जवळीकता साधत काँग्रेसची तिकीट साठी दिवसरात्र एक केले. परंतु पक्षाने त्यांना कोणतेही स्थान देण्याचे नाकारले. यावेळीदेरकर यांनी पुन्हा एकदा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला व आपले नशीब अजमावले. परंतु दरवेळी सारखे यावेळी सुद्धा वणी विधानसभेच्या जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरवली. यावेळीही त्यांना दुःखी मनाने परराभव पत्करावा लागला.

वणी विधानसभा क्षेत्राच्या जनतेने इतक्या वेळा त्यांचे प्रतिनिधित्व नाकल्यानंतरही संजय देरकर यांनी राजकारण काही सोडले नाही. व पुन्हा आपले नशीब अजमविण्यासाठी शिवसेना (उबाठा) गटाची कास धरली. आणि तिकीट मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. वणीकर जनतेच्या मनात त्यांना जागा नसल्याचे दाखविल्यानंतरही ते पुन्हा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक विधानसभा तोंडवार असतांना ते बाहेर येतात व परा भव स्वीकारल्यानंतर ते पुढील 4 वर्षासाठी ते व्यावसायिक म्हणून वावरतात असा जनतेचा आरोप आहे. त्यामुळे शिवसेनेची (उबाठा) तिकीट विश्वास नांदेकर यांनाच देण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांची व वणीकर जनतेची आहे. तसेच विश्वास नांदेकर यांनी 2004 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ता समजल्या जाणाऱ्या वणी विधानसभेला सुरुंग लावून शिवेसनेचा झेंडा रोवण्याचे काम केले होते. मग अशावेळी चार वेळा पराभव पत्करलेल्या नवख्या उमेदवाराला की माजी आमदाराला? यावेळी तिकीट कुणाला मिळणार नवख्या व वारंवार पक्ष बदलविणाऱ्या उमेदवाराला की पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या शिवसैनिकाला हे बघणे बाकी आहे.