Home जालना शिवसेना दुसऱ्याच्या दावणीला बांधण्याचं पाप कोणी केलं ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना दुसऱ्याच्या दावणीला बांधण्याचं पाप कोणी केलं ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

4

घनसावंगी /लक्ष्मण बिलोरे

-‘बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना दुसऱ्याच्या दावणीला बांधण्याचं पाप कोणी केलं ?,खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी कोणी केली?’ असा सवाल उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला उपस्थित जनतेला केला.’तुमचा चेहरा तुमच्याच सहकाऱ्यांना चालत नाही, तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला कसा चालेल.आम्ही बाळासाहेबांच्या, आनंद दीघेंच्या मनातील सरकार स्थापन केले आहे.हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.’असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे केले.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे उबाठा गटाचे नेते डॉ.हिकमत उढाण यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या शिवसेना महाविकास आघाडीमध्ये प्रवेश आणि उढाण यांच्या साखर युनिटचे भुमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी व्यासपिठावर मंत्री प्रतापराव जाधव,जयंत पाटील, संजय शिरसाट,अर्जुन खोतकर, भाऊसाहेब घुगे,मोहन अग्रवाल, अभिमन्यू खोतकर, बळीराम मापारे,किर्तीताई उढाण,चंदाताई शिंदे, हरिभाऊ कोळेकर,धनंजय कोळेकर,उद्धव मरकड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ‘ आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे कल्याणकारी सरकार आहे.हिकमत उढाण यांच्या पक्ष प्रवेशाचे आम्ही स्वागत करतो आहे.उढाण हा एक बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक ,कार्यकर्ता आहे.मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला जख्मी शेर आहे. ‘जख्मीशेर खूंखार होता है,उससे बहुत डरते है ‘दादा’ को मालुम है,किसे डराना है और किसे हराना हैl ‘अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाव्य ,इच्छूक उमेदवार हिकमत उढाण यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.योजनांसंबधी माहिती देतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ‘ मला एकच बहिण आहे मात्र लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २कोटी ३० लाख बहिणी भेटल्या. पैसा किती,मालमत्ता किती या पेक्षा लोकांचे प्रेम किती हे महत्वाचे आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणी लखपती झालेल्या बघायच्या आहेत.,लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता देणारी योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना ,४५ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मोबदला दिला.दोन ,सव्वादोन वर्षात विविध प्रकल्पांना चालना दिली.जन कल्याणकारी योजना आणल्या.टोलमध्ये सुट देण्याचा निर्णय सरकारने घेतला.आमची नियत साफ असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.’ मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘ मराठवाडय़ात नदीजोड प्रकल्प राबविणार.मराठवाड्याला दुष्काळवाडा नाव पडलेले आहे,ते पुसून टाकणार. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मराठवाडा विभागात पाणी प्रश्नावर ८० हजार कोटींचा प्रकल्प पुर्ण करणार आहे. जालना जिल्हा दुष्काळ अनुदानातून वगळणार नाही,’अशी ग्वाही त्यांनी दिली .सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.