Home बुलडाणा साखरखेर्डा येथे पिसाळलेल्या कुत्र्याचे आतंक दहा ते पंधरा जणांना घेतला चावा ,

साखरखेर्डा येथे पिसाळलेल्या कुत्र्याचे आतंक दहा ते पंधरा जणांना घेतला चावा ,

24

 

अमीन शाह

साखरखेर्डा , सिंदखेडराजा

साखरखेर्डा येथे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत अचानकपणे वाढ झाली गल्ली बोळात मोकाट कुत्रे फिरतांना दिसत आहे या मोकाट कुत्र्यांनी गावात आतंक निर्माण केला असून आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल दहा ते पंधरा जणांना चावा घेतल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि. १८ ऑक्टोबर रोजी तांबोळीपुऱ्यातील श्रीमती सईदाबी शेख इब्राहीम तांबोळी (वय ६०) ह्या सकाळी ६ वाजेच्या सुमारास नमाजपठन झाल्यानंतर गल्लीत वॉकिंग करतांना पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक त्यांच्या पोटरीला चावा घेतला. अचानकपणे कुत्र्याने हल्ला केल्याने त्या भांबावल्या व त्याचे तावडीतून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी हाताने त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला परंतु कुत्र्याने त्यांच्या हाताचा लचकाच तोडला. दरम्यान कल्लोळ झाल्याने मोहल्ल्यातील लोकांनी त्यांची कशीबशी सुटका करुन त्यांना लगेच बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात आले.
या पिसाळलेल्या कुत्र्याने नंतर तांबोळीपुऱ्यातीलच शे. अलफेस (वय १४), शे. रय्यान शे. रियाज (वय ६), रेश्मा परवीन शे. इलयास (वय २०), शे. आवेस शे. रियाज (वय १६), अल्वीरा शे. वसीम (वय ६), तसेच म्हसाजी किसन पाझडे (वय ७५), शरद सुभाष गायकी (वय ३५), कृष्णा रामेश्वर डोईजड (वय १०), सुमन लक्ष्मण शिराळे (वय ४५) अशा एकूण १० जणांना चावा घेतल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमार सुरुशे यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र साखरखेर्डा यांनी सुद्धा तत्पर सेवा दिली . पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्राम पंचायतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्या कडून केली जात आहे ,

मेहकर चे कुत्रे साखरखेर्डा येथे ,

गेल्या महिन्या भरा पूर्वी येथे मोकाट कुत्र्यांची संख्या फार कमी होती मात्र गेल्या काही दिवसां पासून येथे बस स्टँड व गावात मोकाट कुत्र्यां मध्ये वाढ झाल्याचे दिसत असून माहिती घेतली असता हे सर्व मोकाट कुत्रे मेहकर येथून कोणी तरी येथे आणून सोडल्याची माहिती प्राप्त झाली आहे ,