Home यवतमाळ आमचं ठरलं डॉ विष्णु उकंडे आर्णी विधानसभा लढवणार

आमचं ठरलं डॉ विष्णु उकंडे आर्णी विधानसभा लढवणार

4

पत्रकार परिषदेत शिवसेना गटाकडून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर.

तालुका प्रमुख.शहर प्रमुख. शिवसेना युवा सेना तथा महिला आघाडीचे पदाधिकारी यांची उपस्थिती.

घाटंजी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून, नुकतीच भाजपाची प्रथम ९९ जणांची यादी जाहीर झाली. या यादीमध्ये आर्णी केळापूर विधानसभा मात्र वगळण्यात आली. याचा अर्थ विद्यमान आमदाराचे तिकीट कटणार का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
यातून घाटंजी येथे महिला मेळावा दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे डॉ विष्णू उकंडे यांनी आपल्या सर्व पक्ष पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद चे आयोजन करून आर्णी केळापूर मतदारसंघात शिवसेना गटाकडून आपण निवडणूक लढवीन्या करीता इच्छूक असून आपल्या पक्षाला तिकीट देण्याची मागणी केली.
सद्या महायुतीच्या सरकार मध्ये दिग्रस दारव्हा व आर्णी केळापूर या दोन जागा शिवसेना शिंदे गटाकडून मागणी होत आहे ही मागणी ताकतीने होत असून व ती मिळणार असा दावा आत्मविश्वासाने ते यावेळी सांगत होते .
आणि सद्यस्थितीत मतदारसंघातील जनतेच्या मुखात केवळ विष्णु उकंडे मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जात आहे.ते शिवसेना शिंदे गटाचे असून पालकमंत्री यांच्या अतिशय जवळचे मानले जात आहे .
त्यांचं सामाजिक कार्य हे दुर्लक्षित करण्यासारखं मुळीचं नाही.आर्णी घाटंजी केळापूर तालुक्यात सण 2006 पासून विविध उपक्रम राबवून अनेक सामाजिक कार्य केले .यामुळे मतदार संघातील अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. अनेक प्रशिक्षण आरोग्य शिबीर कामगार नोंदणी मेळावे अनाथ शिष्यवृत्ती वाटप केले. युवकांच्या विकासा करिता युवा विकास कार्यक्रम राबविण्यात आले. त्यांचे विकासात्मक व्हिजन जनतेच्या चांगलंच लक्षात आहे.
त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ विष्णु उकंडे यांचे नावे जनतेच्या तोंडून सर्वत्र ऐकायला मिळत आहेत.
सोबत हजारो महिला व कार्यकर्ते यांच्याकडून ही यावेळेस डॉ विष्णू उकंडे याना उमेदवारी मिळावी मागणी होत आहे यावेळी राजुदास जाधव सह संपर्क प्रमुख,डॉ विष्णू उकंडे उपजिल्हा प्रमुख आकाश राठोड (युवासेना जिल्हाप्रमुख) शिवसेना तालुका प्रमुख आर्णी राजेंद्र जाधव. घाटंजी तालुका प्रमुख निलेश चव्हाण . जयवंत बंडेवार केळापूर तालुका प्रमुख. वसंतराव मोरे शिवसेना शहरप्रमुख घाटंजी. नटवर शर्मा पांढरकवडा शाम ठाकरे आर्णी तसेच आर्णी केळापूर विधान सभा लढविन्या संदर्भात चर्चा केली. यावेळी या प्रसंगी शिवसेना युवा सेना तथा महिला आघाडीचे पदाधिकारी व हजारो महिला उपस्थित होते.