Home यवतमाळ यादीत नाव असलेले पत्रकार बाकी सर्व चित्रकार – विनोद पत्रे

यादीत नाव असलेले पत्रकार बाकी सर्व चित्रकार – विनोद पत्रे

25
चैरिटी कमिशनरकडे कुठेही नोंद नसलेल्या व परवानगी न घेतलेल्या दोन हजार रुपयाची पावती फाडणारा….
पत्रकार परिषदेसाठी दोन हजार रुपये घेणाऱ्या चार पावती आमच्या हाती , त्या चार पावत्यांचा लवकरच होणार खुलासा
यवतमाळ – कोणी म्हणतो ही पत्रकारांची यादी या पत्रकारांनी दिली त्या पत्रकारांनी दिली, कोणी म्हणतो ही यादी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिली मग या यादीतील खरे पत्रकार कोण ठरवणार??
या यादीतील खरे पत्रकार जिल्हा माहिती अधिकारी , पत्रकार संघटना , जिल्हाधिकारी ठरवणार का? प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाची गरज असते मग प्रत्येक व्यक्ती आपल्या परिस्थितीनुसार शिक्षण शिकत असतो डॉक्टर बनण्याकरिता एमबीबीएस , शिक्षक बनण्याकरिता बीएड तर वकील बनण्याकरता एलएलबी परीक्षा पास व्हावी लागते मात्र पत्रकार बनण्यासाठी जगात कुठलीही तरतूद नाही , फक्त मोठ्या वृत्तपत्रात व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये शिक्षण व पत्रकार डिग्री प्राप्त असणाऱ्या व्यक्तींना स्थान दिल्या जाते , या संदर्भात मी स्वतः विनोद पत्रे व पत्रकार संरक्षण समिती मार्फत संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला , येणाऱ्या काळात या गोष्टीचा व शिक्षणाचा नक्कीच विचार केल्या जाईल मात्र प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची नोंदणी करताना कुठेही शिक्षणाचा उल्लेख केलेला नाही…, म्हणूनच तुम्ही पत्रकार आम्ही चित्रकार ?? येणारा काळच सांगेल यात कुठल्याही प्रकारचे तीळमात्र शंका नाही .
प्रत्येकाचा एक दिवसात असतो व यायलाही पाहिजेल . मी 2012 मध्ये एकट्या लढलो तेव्हाही मागे हटलो नाही , आताही हटणार नाही …. लिहिण्यासारखे बरेच काही आहे परंतु तूर्तास एवढेच….!