9लाख 59 हजार लुटून नेल्याची तक्रार ,
जबरी चोरीचा गुन्हा दाखल ,
अमीन शाह
– नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ मनसेच्या उमेदवारावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मनसेचे उमेदवार प्रसाद सानप यांनी मनसेचे पक्ष कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांच्याकडे निवडणूक खर्चासाठी विशिष्ट रक्कम दिली होती. मात्र पक्ष कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांनी निवडणूक खर्चासाठी दिलेली रक्कम वापरली नाही, असा आरोप प्रसाद सानप यांनी केला आहे.
–
निवडणूक खर्चासाठीचे पैसे परत मागण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रसाद सानप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी योगेश पाटील यांच्या घरात घुसून त्यांच्या घरातून 8 लाख 84 हजार रुपये रोख आणि त्यांच्या आईची अडीच तोळ्याची पोत असा एकूण 9 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेल्याची तक्रार योगेश पाटील यांनी केली आहे. या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी मनसेचे उमेदवार प्रसाद सानप यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर असा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकमध्ये मनसे उमदेवार प्रसाद सानप यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसाद सानप हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार आहेत. मनसेचे कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांनी सानप यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
मनसेचे उमेदवार प्रसाद सानप यांनी मनसेचे पक्ष कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांच्याकडे निवडणूक खर्चासाठी एक विशिष्ट रक्कम दिली होती. मात्र पक्ष कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांनी निवडणूक खर्चासाठी दिलेली रक्कम वापरली नसल्याचा प्रसाद सानप यांनी आरोप केला. हेच पैसे परत मागण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रसाद सानप आणि त्याच्या सहकाऱ्यांचा पाटील यांच्यासोबत वाद झाला.