अमीन शाह
बुलडाणा ,
समृद्धी महामार्गावरील ट्रक चालकांच्या डिझेलची चोरी करणारी टोळी पकडण्यात बिबी पोलिसांच्या पथकाला यश आले असून, मोठ्या शिताफीने बिबी पोलिसांनी आरोपींच्या चिखलीतील घरावर छापा टाकून अटक केली आहे या आरोपींकडून स्कॉर्पिओ, स्विफ्ट डिझायरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना आज न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता, न्यायालयाने सर्वांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार
दिनांक १३/११/२०२४ रोजी फिर्यादी नामे किरण कुमार लिंगया कन्नूकुंटला वय वर्ष ३८, रा. कल्याणी टॉवरजवळ चंद्रपूर, तालुका जि. चंद्रपूर यांनी पोलिस स्टेशन बिबी येथे रिपोर्ट दिला की, मी समृद्धी महामार्गाने मुंबई ते नागपूर रोडने ट्रक घेऊन नागपूरकडे जात असताना दुसरबीड टोल नाक्याजवळ रस्त्यावर वाहन थांबून आराम करत असताना दिनांक १३/११/२०२४ रोजी रात्रीचे ३ वाजताचे सुमारास ट्रकच्या डिझेल टाकीतील अंदाजे ८० लीटर डिझेल किंमत ७ हजार रूपयांचे चोरून नेले व माझ्या ट्रकचे काचाला दगड मारून समोरील काच फोडून अंदाजे ५ हजार रूपयांचे नुकसान केले. अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन बिबी अपराध नंबर २४४/२०२४ कलम ३०३ (२), ३२४ (४) भारतीय न्यायसंहिता प्रमाणे दाखल करून तपासात घेतला. सदर गुन्ह्याचे तपासात गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या खबर प्रमाणे तसेच तांत्रिक साधनांचा वापर करून कसोशीने तपास करून आरोपी निष्पन्न करून दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी ठाणेदार एपीआय संदीप पाटीलसह सफो परमेश्वर शिंदे, नापोकॉ अरूण सानप, पोकॉ रवींद्र बोरे यांनी पोलीस स्टेशन चिखली हद्दीत गजानननगर चौफुलीवर गोपनीय बातमीच्या आधारे छापा टाकून आरोपी लक्ष्मण उर्फ संतोष गुलाबराव लहाने वय वर्ष २७ रा. खंडाळा मकरध्वज ता. चिखली, नीलेश संतोष भारूडकर वय वर्ष ३२, रा. सातगाव भसारी ता. चिखली.
देविदास प्रकाश दसरे वय वर्ष २८ रा. साखरखेर्डा ता. सिंदखेडराजा यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून एक स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एमएच २८ व्ही ८४०९ किंमत ३ लाख ५० हजार रुपये व एक स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच १२ एचझेड ५५७५ किंमत अंदाजे ३ लाख रुपयांचे वाहन, तसेच त्यातील ३५ लीटर क्षमतेच्या रिकाम्या चार कॅन असे साहित्य जप्त करण्यात आले.
या आरोपींनी गुन्ह्यातील डिझेल सचिन परशराम घुबे रा.
देऊळगाव घुबे याला विक्री केले आहे. वरून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने डिझेल विकत घेतल्याची कबुली दिल्याने नमूद आरोपी लक्ष्मण उर्फ संतोष गुलाबराव लहाने वय वर्ष २७ रा. खंडाळा मकरध्वज ता. चिखली, नीलेश संतोष भारुडकर वय वर्ष ३२ रा. सातगाव भुसारी, देविदास प्रकाश दसरे वय वर्ष २८ रा. साखरखेर्डा व सचिन परशुराम घुबे वय वर्ष २७ रा. देऊळगाव घुबे ता. चिखली यांना दिनांक २१ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने दिनांक २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहिते करीत आहेत.