नांदेड / देगलूरा , दि 13 :- ( राजेश भांगे ) नांदेड जिल्हा देगलूर तालुक्यातील खानापुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिनांक 12-2-2020 रोजी शालेय पोषण आहारातुन दिडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली.
सर्व विषबाधित विद्यार्थ्यांना देगलूर येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारा नंतर सर्व विद्यार्थ्यांना आपआपल्या घरी पाठविण्यात आले परंतु पाच विद्यार्थ्यांन वर अजुनही उपचार चालू असल्याचे व्रत समोर आले .
जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत पहिली ते आठवी पर्यत शिक्षणाची व्यवस्था असुन नेहमी प्रमाणे शाळेत खिचडी शिजवून विद्यार्थ्यांना जेवण दिले जाते शाळेतील खिचडी शिजवणारी रोजची व्यक्ती गैरहजर असल्याने त्याच्या जागी नविन दुसऱ्या व्यक्ती ने खिचडी शिजवुन विद्यार्थ्यांना जेवन दिले असता त्याच्या हलगर्जी पणा मुळेच खिचडी मध्ये पाल पडल्याने सातवी वर्गात शिकत असलेला विद्यार्थी तुकाराम आनंदा बंडे या विद्यार्थ्यांच्या ताटात जेवण करते वेळेस म्रत आवस्थेत पाल आढळल्याने त्याला विषबाधा होवुन उलटी आणि पोटात दुखण्यास सुरवात झाले व पाहता पाहता शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना उलट्या व पोटदुखीचे त्रास सुरू झाल्याने त्याच वेळी सर्व विद्यार्थ्यांना देगलूर येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिक्षक संभाजी पाटिल यांनी व डाॕ.विश्वनाथ मलशेटवार यांनी तात्काळ आपल्या स्टाफला अॕक्शन मध्ये आणुन वेळीच सर्व विद्यार्थ्यांना सलाईन लावुन योग्य औषध उपचार केल्याने विद्यार्थ्यांना झालेल्या विष बाधेवर नियंत्रण मिळवण्यात यश आले .
तरी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या जिवाला विषबाधेतुन धोका निर्माण झाला होता या घटने बद्दल पालक वर्गातुन तिव्र संताप व नाराजी व्यक्त करण्यात येते आसल्याचे समजते . यावेळी देगलूर बिलोलि मतदान संघाचे विद्य आमदार मा.श्री.अंतापुरकर व देगलूरचे डि,वाय एस.पी.मा. श्री.सरवदे यांनी व देगलूर मधील काहि पदाधिकारी तसेच कार्यकर्तेंनी रूग्णालयात येवुन विद्यार्थ्यांची भेट घेवुन प्रकरतीची चौकशी केली व घडलेल्या घटने विषयी चिंता व्यक्त कले .
या वेळी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी पालक वर्गासोबतच नागरीकांनी गर्दी केली असता यावेळी देगलूरचे पोलिस निरिक्षक श्री.भगवान धाबडगे यांनी तात्काळ आपल्या टिम सोबत शासकीय उपजिल्हा रूग्णालयात धाव घेवुन परिस्थिती वर नियंत्रण मिळविले.