मनोज गोरे – प्रतिनिधी
चंद्रपूर / गडचिरोली , दि. १८ :- जिल्ह्यांमध्ये भगवान पुराण जिल्हा अध्यक्ष कल्पना गजभिये महिला जिल्हा अध्यक्ष गजानन पुराण सचिव योगपती वाकुलकर रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया(ए) कार्यकारिणी गठित करण्यात आली आहेत या कार्यकारिणीत विदर्भ राज्य महिला अध्यक्ष प्रिया खाडे यांनी संपूर्ण विदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी चे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू केले असून प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात कार्य कारणी करून रिपब्लिकन पार्टीआफ इंडिया(ए) कशी वाढेल याकडे लक्ष दिल्या जात आहेत रिपब्लिकन पार्टीने आपले कार्य मोठ्या जोमात सुरू केले आहेत अनेकांची पदाकरिता वर्णी लागत आहेत मात्र यामध्ये होतकरू सामाजिक अन्याय अत्याचारा लढा देणारे झुंजार कार्यकर्त्यांची वर्णी पार्टीमध्ये लागली आहेत तेव्हा अनेक कार्यकर्त्यांचा यामध्ये इतर पार्टीतून प्रवेश होत आहेत या पक्ष वाढीच्या कार्याला मोठी बळकटी मिळत आहेत विदर्भ अध्यक्ष प्रिया खाडे यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपला दौरा करत असताना अनेक पक्षातील कार्यकर्त्याचे आपल्या पार्टीत प्रवेश करून घेत आहेत नुकताच झालेल्या गडचिरोली येथे जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या जोमात पार्टीचे काम चालू आहेत येणाऱ्या काही महिन्यात रिपब्लिकन पार्टी तर्फे मोठा जिल्हा स्तरावर मेळावा आयोजित करून यामध्ये अनेक पक्षातील कार्यकर्ते प्रवेश होतील व तसेच या मेळाव्यात वरिष्ठ नेते मंडळी मार्गदर्शन करणार आहेत असे मत विदर्भ राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रिया खाडे यांनी व्यक्त केले
प्रतिनिधी मनोज गोरे