Home महत्वाची बातमी तलावाजवळ खेळण्यासाठी गेलेली दोन बालके बुडाल्याची चर्चा , “शोध कार्य सुरू”

तलावाजवळ खेळण्यासाठी गेलेली दोन बालके बुडाल्याची चर्चा , “शोध कार्य सुरू”

109

अब्दुल कय्युम

औरंंगाबाद , दि. १९ :- मिसारवाडी परिसरातील पिपरी तलावाजवळ खेळण्यासाठी गेलेली दोन बालके बुडाल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचायांनी घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत पाण्यात बुडालेल्या बालकांची कोणतीही माहिती मिळाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सुत्रांनी दिली.
मिसारवाडी परिसरातील पळशी गावात असलेल्या पिपरी तलावाजवळ काही बालके सायंकाळच्या वेळी खेळण्यासाठी गेली होती. त्यापैकी अंदाजे १२ वर्ष वयाची दोन बालके पाण्यात बुडाली. हा प्रकार काही नागरीकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला व पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचायांनी घटनास्थळी धाव घेतली बातमी लिहोस्रतर शोध कार्य सुरू होते.