Home महत्वाची बातमी आखेर माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना जामीन मंजूर

आखेर माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना जामीन मंजूर

135

अमीन शाह

नागपूर , दि. २० :- माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. सार्वजनिक जीवनात लोकांसाठी संघर्ष करताना निर्माण झालेल्या या केसेस आहेत. यामागे कोण आहेत, हे मला माहित आहे. या लोकांची नावे बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी सुनावणी झाल्यानंतर दिली. पुढील सुनावणी ३० मार्चला होणार आहे.
२०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी नागपुरातील जेएमएफसी न्यायालयात सुनावणीसाठी देवेंद्र फडणवीस यांना अखेर आज गुरुवारी न्यायालयात हजर राहावच लागलं. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फडणवीसांना स्थानिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फडणवीस आज हजर झाले. त्यासाठी ते काल रत्रीच नागपुरात पोहोचले होते. न्यायालयाने समन्स बजावले होते. त्यानुसार मी आज गुरुवारी न्यायालयात हजर झालो. वैयक्तिक जातमुचलका देऊन मला जामीन देण्यात आल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
माझ्यावरील केसेस आंदोलनाच्या आहेत. त्या लपण्याचं कुठलही कारण नव्हत. वकिलांच्या निर्णयानुसार मी प्रतिज्ञापत्र भरलं. कलम १२६ प्रमाणे निवडणूक जिंकण्यासाठी लपवण्यासारख्या त्या केसेस नव्हत्या. मी दोन्ही वेळा ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी जिंकलो आहे. सार्वजनिक जीवनात लोकांसाठी संघर्ष करताना निर्माण झालेल्या त्या केसेस आहेत. प्रकरण न्यायालयात असल्याने अधिक बोलणार नाही. यामगे कोण आहे, हे मला माहित आहे, योग्यवेळी बाहेर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्याकडून अ‍ॅड. उदय डबले यांनी तर, अ‍ॅड. सतीश उके यांनी स्वत: बाजू मांडली.