यवतमाळ , दि. २० :- आज बाभूळगाव तालुक्यातील कोपरा जानकर गावात शिवजयंती निमित्य शोभायात्रा काढण्यात आली .
ही शोभायात्रा गावतातील राममंदिर चौकातून निघून गावातील मुख्य रस्त्याने व राष्ट्रसंत चौकातून मार्गक्रमण करीत परत राममंदिर चौकात आली.
दरम्यान शोभायात्रेत दरम्यान लहान – लहान चिमुकल्यानी शिवाजी महाराज जिजाऊ माता यांची वेश भूषा परिधान केल्याने हे शोभयात्रेचे मुख्य आकर्षण बनले होते.
त्यानंतर ही शोभायात्रा राममंदिर चौकात आल्यानंतर शोभा यात्रेचे कार्यक्रमात रूपांतर झाले तर यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र उमरतकर तर प्रमुख पाहुणे संजय खोडे , महादेव कावरे , कल्पक वाईकर , मयुर पिसे , रंजना वासे , संगिता विहिरे , संगीता विहिरे हे होते तर वक्ते म्हणून श्रीनिवास दरेकर होते सूत्र सुसंचालन हर्षदा गडदे तर आभार विशाल खादवे यांनी मानले.