अब्दुल कय्युम
औरंगाबाद , दि. २१ :- दिनांक २० फेब्रुवारी २०२०. जी. पॅट. (ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट) राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी परीक्षा असून या वर्षी संपूर्ण भारतातून ह्या परीक्षेत ४९००० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभाग झाले होते त्यानून फक्त ४००० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
औरंगाबादेतून ५० च्या जवळ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. वाई. बी. चौहान कॉलेज ऑफ फार्मसी चे ३६ विद्यार्थांचा यात समावेश आहे. संपूर्ण भारतात “ऑल इंडिया रँक वॅन” चा स्थान देखील याच महाविद्यालयाच्या विद्यार्थी उमर खान याने पटकावला आहे. जैतुन एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी च्या वतीने, ऑल इंडिया जी. पॅट. परीक्षेत उत्तीर्ण ३० विद्यार्थ्यांचा भव्य दिव्या सत्कार समारंभ भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे दिनांक १८ फेबुरवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आला होता. शम्मास खान यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मध्ये संस्थेचे ध्येय व उद्देश प्रस्तुत केले. खासदार इम्तियाझ जलील यांच्या हस्ते जी. पॅट. परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वखाड कंपनी चे सहकारी संचालक डॉ. एम. एल. ए. बेग व वाई. बी. चौहान कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. जाहेद झहीर यांची प्रमुख उपस्थिती होती. शारेक नक्शबंदी, यासेर मोहिउद्दीन व मिर्झा अफझल बेग यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती. मोहम्मद अस्लम यांनी या प्रसंगी उपस्थितांना ऑल इंडिया जी. पॅट. परीक्षा उत्तीर्ण करण्याचे गुरुमंत्र दिले. जैतुन एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी चे अध्यक्ष डॉ. साहेरा नसरीन, सचिव शम्मास खान व मौलाना तफझुल हुसैनी हि या प्रसंगी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहेल झकीऊद्दीन यांनी तर आभार प्रदर्शन मोहम्मद दानिश यांनी व्यक्त केले.