Home मराठवाडा टिवंकल स्टार शाळेतील विद्यार्थिनीने विभागीय स्केटींग स्पर्धेत सुवर्ण व रजत पदक पटकावले

टिवंकल स्टार शाळेतील विद्यार्थिनीने विभागीय स्केटींग स्पर्धेत सुवर्ण व रजत पदक पटकावले

187

सय्यद नजाकत – बदनापूर

जालना , दि. २३ :- येथील टिवंकल स्टार शाळेतील विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त्‍ विभागीय स्केटींग स्पर्धेत एक सुवर्ण व एक रजत पदकाची कमाई करून ग्रामीण भागातील विद्यार्थीही संधी मिळाल्यास संधीचे सोने करू शकतात हे दाखवून दिले.

औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय स्केटींग स्पर्धा रोलर रिले स्केटिंग असोसिएशनच्या वतीने नारायणा स्कूलच्या स्केटिंग ट्रॅकवर करण्यात आलेली होती. या स्पर्धेत बदनापूर येथील टिवंकल स्टार शाळेतील विद्यार्थीनी बाराई डोना हिने सहभाग घेतला या स्पर्धेत या विद्यार्थीनीने चमकदार कामगिरी करत दोन पदकांची कमाई केली. यावेळी एक सुवर्ण पदक व एक रजत पदकांसह शिवमूर्ती व प्रमाणपत्रे देऊन तिचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. बदनापूर सारख्या ग्रामीण भागात स्केटिंग सारखा खेळ शिकवण्यासाठी टिवंकल स्टार स्कूलने विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून दिलेली असून अनुजा देशमुख यांनी या विद्यार्थीनाला प्रशिक्षण दिलेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानाही संधी मिळाल्यास ते चमकदार कामगिरी करू शकतात हेच यावरून दिसून येते. बाराई डोना हिने मिळवलेल्या या यशाबददल तिचे संस्थेचे अध्यक्ष दत्ताभाऊ पाथ्रीकर, प्राचार्या डॉ.एम. डी. पाथ्रीकर, कार्यकारी संचालक डॉ.देवेश पाथ्रीकर, क्रीडा संचालक डॉ. शेख एस. एस., क्रीडा विभाग प्रमुख डॉ. खान एन. जी., डॉ. सुशील लांडे, मुख्याध्यापिका अमीना सय्यद आदींनी अभिनंदन केले आहे.