हाताला काम नसल्याने जनतेला घ्यावा लागतो जनधन च्या पैश्याचा आधार.
नांदेड / किनवट , दि. १३ :- कोरोना च्या महामारी मुळे सर्व कामधंदे बंद असल्याने रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला असून कोरोना च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी जनधन च्या खात्यावर टाकलेल्या ५०० /-रूपयाचे आधार भेटला असून ते पैसे काढन्यासाठी एस बी आय बँक,व ग्राहक सेवा केन्द्र समोर रांगाच रांगा व गर्दी केल्याने सोशल डिस्टनिंगचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या सारखणी दिसत आहे.
कोरोना मुळे घेतलेल्या लॉक डाउन चा २१ वा दिवस असून या दिवसात संपूर्ण १००% काम बंद असल्याने जनतेच्या रोजी रोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. जीवनावश्यक वस्तु कुठून आणावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक अडचणीत जनता सापडली असून यात पंतप्रधान मोदी यांनी जनधन च्या खात्यावर पाचशे रुपये जमा केल्या चे माहिती होताच जनतेने ते रुपये काढून जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्या साठी एस बी आय बँक, ग्राहक सेवा केन्द्र बँके समोर सकाळी नऊ वाजे पासून रांगेत उभे राहून आपले ५००/- काढून जीवनावश्यक वस्तु खरेदी करुण आपल्या घरी परतत आहेत.
लॉक डाउन मुळे १००% प्रवासी वाहतूक बंद असल्याने परिसरातील गावातील आबाल व्रध पाय पिट करत सारखनी येथे असलेल्या बँकेत पैसे काढण्यासाठी येत असल्याने बँकेच्या समोर गर्दीच गर्दी केल्याने सोशल डिस्टनिंगचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या सारखणी दिसत आहे.