Home रायगड लॉकडाऊनमध्ये पोलिस बांधवांसाठी दैनंदिन नास्ता व भोजनाची व्यवस्था….!

लॉकडाऊनमध्ये पोलिस बांधवांसाठी दैनंदिन नास्ता व भोजनाची व्यवस्था….!

197

सामाजिक कार्यकर्ते सागर शेळके यांचा पुढाकार….!!

कर्जत – जयेश जाधव

संपूर्ण देशात कोरोनासारख्या महामारीचा शिरकाव झाल्यानंतर अनेक देश या महामारीपासून वाचण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसतात. मात्र, अनेक देशात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या आणि मृतांचा दैनंदिन वाढणारा लक्षणीय आकडा लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने तत्काळ लॉकडाऊन जाहीर करुन सोशल डिस्टसिंगची अंमलबजावणी करण्यासाठी नागरीकांना जाहीर आव्हान केले. त्याक्षणापासून पोलीस व आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस नागरीकांच्या सेवेत तत्परतेने काम करत आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेला दक्ष राहून काम करताना त्यांना वेळेवर नास्ता, अन्न, पाण्याची सोय व्हावी या सामाजिक भावनेतून सामाजिक कार्यकर्ते तथा कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सागर शेळके या तरुणाने लॉकडाऊनमध्ये कर्जत पोलिस ठाण्यातील पोलिस बांधवांसाठी दैनंदिन नास्ता, भोजनाची व्यवस्था केल्याने तरुणाच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून सर्व सामान्य नागरीकांना फक्त घरात बसा आणि सःताची व परीवाराची काळजी घ्या असे आवाहन सरकार सातत्याने करताना दिसत आहे. तर, पोलिस व आरोग्य विभाग डोळ्यात तेल घालून आपली जबाबदारी चोख पाडताना आपल्या परीवारापासूनही सोशल डिस्टसिंग पालताना नाहक यातना त्यांना सहन कराव्या लागत असल्याने पत्नी, मुल, आई-वडील त्यांच्यापासून स्वःतला विलनिगीकरण कक्षात डांबून देशसेवा करताना दिसतात. त्यामुळे या देशसेवा करणाऱ्या देवदुतांसाठी एक हात माणुसकीचा या तत्वानुसार कर्जतमधील डिकसल येथील सामाजिक कार्यकर्ते सागर शेळके या ध्येयवेड्या तरुणाने आपल्याकडूनही देशसेवा काही व्हावी म्हणून २४ मार्च ते १४ एप्रिल असे एकूण २२ दिवस कर्जत आणि नेरळ पोलिस ठाण्यात मोफत नास्ता त्यामध्ये चहा, पोहे, उपमा तर कर्जत पोलिस ठाण्यातील आणि बाहेरून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस बांधवांसाठी दररोज दुपारी भोजन व्यवस्था त्यामध्ये व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव, बटाटा भजी आणि पुरी भाजीचे बंदिस्त पॉकेट करुन डिकसल येथील हँप्पी हॉवर्स या रिसॉर्ट येथून कंटेनरमधून दररोज थेट कर्जत पोलिस ठाण्यात व नाकाबंदी असणाऱ्या ठिकाणी पोहोचले जात आहे.
त्यामुळे आपल्या परीने कोरोना दरम्यान देश एका जैविक संकटाशी सामना करताना या देशसेवेत आपलाही थोडाफार हातभार लागावा हि असणारी भावना सर्व काही सांगून जात असल्याने या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*प्रतिक्रिया*
“आज संपूर्ण देश कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सर्व जाती, धर्म, पंथ विसरुन सर्व धर्म समभावाचे दर्शन घडवताना दिसत आहे. त्यामुळे आपणही देशाचे एक सुजाण नागरीक म्हणून प्रत्येकजण काहीना काही योगदान देत देशसेवेत मग्न आहेत. म्हणून या कार्यात आपलाही अल्प स्वरुपात हातभार लागावा यासाठी असे योगदान यापुढे देत राहणार”
*सागर शेळके*
(सामाजिक कार्यकर्ते, डिकसल – कर्जत)