Home मराठवाडा शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांची नोंद कामगार कार्यालयातर्फे करावी- महेंद्र गायकवाड

शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांची नोंद कामगार कार्यालयातर्फे करावी- महेंद्र गायकवाड

361

कोरोनामुळे पत्रकाराचा मृत्यू झाल्यास 1 कोटी भरपाई द्या पत्रकार संरक्षण समितीची मागणी

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पञकारांची रितसर माहिती कामगार कार्यालया मार्फत नोंद करुन घ्यावी व कर्तव्यावर असताना कोरोना बाधित पञकारांचा मृत्यू झाल्यास पञकाराच्या वारसदारास एक कोटी रुपये भरपाई देण्यात यावी अशी मागणी नांदेड जिल्हा पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पञकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे . कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे .आपल्या महाराष्ट्रात देखील पिडीत नागरिक आहेत .अशा परिस्थितीत पञकार ,डाॕक्टर ,पोलीस प्रशासन व महसुल प्रशासन असे विभाग स्वतःचा जिव धोक्यात घालुन काम करत आहेत.

तसेच पत्रकार वगळता अन्य सर्व विभागांना राज्य व केंद्र सरकारने शासनाची मदत जाहीर केली आहे .पञकार घटनास्थळी जाऊन प्रिंट ,इलेक्ट्रॉनिक्स , वेब न्युज , सर्व पञकार हे सर्व जनहितार्थ जिव धोक्यात घालुन कोरोना या रोगाबदल सत्य माहिती देण्यासाठी दिवस राञ काम करित आहेत .आशा वेळी ग्रामीण /शहरी पञकारांची रितसर माहिती कामगार कार्यालया मार्फत नोंद करुन घ्यावी .व कोरोणा “आरोग्य सुरक्षा विमा कवच” त्यांना देण्यात यावे .व शहरी /ग्रामीण पञकाराचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसदारास एक कोटी रुपये नुकसान भरपाई धावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड ,जिल्हासचिव शशिकांत गाढे पाटील, शहराध्यक्ष संजय निळेकर ,दक्षिण विभाग प्रमुख प्रशांत बारादे, शुभम डांगे, विरभद्र येजगे, ज्ञानेश्वर डोईजड(मुखेड),बबलू शेख (कंधार) , बालाजी घडबळे (हदगाव), ए. जी. कुरेशी,संजय पोवाडे (बिलोली), सचिन कांबळे, दिनेश शर्मा (मुदखेड) , डॉ. सुधीर येलमे (धर्माबाद) , माधव मेकेवाड (भोकर) , कैलास सोनकांबळे, अशोक झडते(उमरी)श्याम पाटील नळगे (लोहा) यांनी केली आहे.