यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही…
रवि माळवी
यवतमाळ – महागांव येथून दिनांक २० एप्रिल रोजी अत्यावश्यक सेवेच्या बनावट पास तयार करुन दिल्या प्रकरणी आरोपी अजिंक्य प्रदिप गंगमवार रा.महागांव याला अटक करुन महागांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद करण्यात आले होते. या प्रकरणात आज आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे.
उपरोक्त गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य गंगमवार याचे कडे केलेल्या तपासादरम्यान त्याने अशाच स्वरुपाच्या अत्यावश्यक सेवेच्या बनावट पासेस तयार करुन दिल्या असल्याचे तपासात पुढे आल्याने आरोपी सुनिल सखाराम खंदारे (३६) रा.आमणी ता. महागांव याचेकडील वाहन मिनीट्रक पिकअप एम.एच.-२९-बीई-१३६७ या वाहना करीता, मोहम्मद जिब्रान मोहम्मद अल्ताफ कच्छी (२४) रा.महागांव याचेकडील टाटा एस जिप क्र.एम.एच.२६ एचडी- ८३६५, अविनाश साहेबराव ढाले (३३) रा.दगडथर ता.महागांव याचेकडील अॅपे अॅटो क्र. एम.एच.-२९- बीडी-११९२ या वाहना करीता, पवन शंकर मुत्तेपवार (३५) रा.फुलसावंगी ता.महागाव याचेकडील आयशय एम.एच.४८- एजी-२५४८ या वाहनाकरीता बनावट पासेस तयार करुन दिलेल्या असल्याने नमुद सर्व ईसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडील केलेल्या तपासात नमुद ईसमांना त्यांचेकडे असलेल्या पास ह्या बनावट असल्याचे माहीती असतांना सुध्दा स्वत: किंवा ईतरांनी ती खरी म्हणून वापरण्याचे उद्देशाने कब्जात बाळगुन असतांना मिळून आले असल्याने नमुद सर्व ईसमांना उपरोक्त गुन्ह्याचे तपासाकामी अटक करण्यात आली असून त्यांचेकडून ३ मोबईल व त्यांचे नावा समोर दर्शविलेली वाहने असा एकुण १७ लाख २५ हजार रुपयाचा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यता आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर करीत आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राज कुमार , अपर पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांचे मार्गदर्शनात यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर, पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पोलीस हवालदार गोपाल वास्टर, मुन्ना आडे, पंकज पातुरकर, मो.ताज, रेवण जागृत सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतामळ यांनी पार पाडली.

Post Views: 313