Home विदर्भ बोर्डी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सोशल डिस्टसिंगचा फज्जा….

बोर्डी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सोशल डिस्टसिंगचा फज्जा….

205

शासनाच्या आदेशाची नागरीकां कडून पायमल्ली….

देवानंद खिरकर

अकोला / अकोट – तालुक्यातील ग्राम बोर्डी येथिल जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शिवपुर , बोर्डी,रामापुर,राहणापुर , ह्या चारही गावचे नागरिकांचे खाते काढलेले आहेत.तरी जनधन योजने अंतर्गत 500 रुपये,प्रधानमंत्री उज्वला गैस योजनेचे 700 रुपये,बाल कामगार मंडळ मार्फत मजुराचे 2000 हजार रुपये,शेतकर्याचे 2000 हजार रुपये असे शासनाद्वारे विविध योजने अंतर्गत जमा झालेली रक्कम काढण्याकरिता नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येते.शासनाने दिलेल्या नियमांचे कुठलेही पालन होतांना दिसत नाही.शासनाच्या नियमांचा नागरिकांद्वारे पूर्णपणे फज्जा उडवला जात आहे.नागरिकांनी तोंडाला मास्क लावने बंधनकारक असतांना सुध्दा तोंडाला मास्क बांधलेले दीसत नाही,बँकेत नागरिकांची हात धुण्याची व्यवस्था सुध्दा करण्यात आलेली नाही,बँके समोर नागरिकां करिता उभ रहायला सोशल डिस्टसिंगचे गोल सुध्दा आकारलेले दीसत नाहीत.सर्व नागरीक हे एका जागी घोळक्याने बसलेले दीसत असून बॅकव्यवस्थापन व ग्रामसेवक यानी नागरिकाना कोरोणा या व्हायरस बद्दल कल्पना देऊन शासनाचे आदेशाचे पालन करावे नाका तोडाला मास्क लावावा सावलीची व्यवस्था करावी बॅकेनी या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावे.