Home कृषि व बाजार कापूस खरेदी केद्र सुरु शेतक-यांनी लॉकडाऊनचे पालन करुन कापूस विक्रीस आणावा.!

कापूस खरेदी केद्र सुरु शेतक-यांनी लॉकडाऊनचे पालन करुन कापूस विक्रीस आणावा.!

234

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – भारत कापूस महामंडळ Cotton Corporation of india यांचे मार्फत कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आले आहे. शेतक-यांनी कापूस विक्रीस आणण्यापूर्वी बाजार समितीचे निरिक्षक किंवा संबधित लिपीक यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून विक्रीस आणणा-या मालाची नोंदणी करावी. नोंदणी झाल्या नंतरच केल्यांनतर जिनींगला माल विक्रीस आणावा तसेच महामंडळाच्या सूचनाचे पालनासोबतच लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन भारत कापूस महामंडळाने केले आहे.
सबंधित तालुक्यातील बाजार समिती मध्ये शेतक-यांनी कापुस, शेतमाल विक्री नेतांना सुचना चे पालन करणे आवश्यक आहे.
खरेदी केंद्रावर कापुस घेवुन जाणा-या शेतक-यांची नोंदणी कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत होणार असून यासाठी बाजार समितीने स्वतंत्र्य टोकन रजिस्टर ठेवावे. शेतक-यांची नोंदणी करुन त्यामध्ये खरेदी केंद्रावर कापुस घेवुन येणा-या शेतक-यांचे नाव संपर्क क्रमांक कापुस खरेदीचा संभाव्य दिनांक अंदाजे वजन व आवश्यकते प्रमाणे इतर तपशिल नमुद करावा.
बाजार समितीत शेतक-यांनी माल आणते वेळी आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. शेतक-यांनी बाजार समितीचे निरीक्षक व लिपीक यांचा मोबाईल वर कार्यालयीन वेळेत 22 एप्रिल 2020 पासून संपर्क साधावा व नोंदणी नंतर जिनिंगला कापुस आणण्यासाठी त्यांना बाजार समितीकडुन फोन किंवा लघुसंदेश (SMS) व्दारे लगेच कळविण्यात येईल यांची नोंद घ्यावी. शेतक-यांनी सदरची नोंदणी फोनव्दारे करावी. त्यानंतर बाजार समिती मार्फत SMS आल्यावरच शेतक-यांनी खरेदी केंद्रावर शेतमाल विक्रीस घेऊन जावे. असे भारत कापूस महामंडळाने कळविले आहे.