Home विदर्भ प्राध्यापक देत आहे दररोज तीन तासांचे ऑनलाइन शिक्षण

प्राध्यापक देत आहे दररोज तीन तासांचे ऑनलाइन शिक्षण

149

श्री. कि.न.गो महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम ; शेकडो विद्यार्थी घेत आहे लाभ

प्रतिनिधी – कारंजा (लाड)

कोरोना व्हायरसने जगासह देशभरात धुमाकूळ घातले आहे.या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व शाळा कॉलेजांना सरकार कडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी राहूनही महाविद्यालयातील शिक्षण वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील श्री.किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या विद्यार्थ्यांना झूम-मीटिंग ॲप्लिकेशनद्वारे घरी दररोज तीन तासांचे ऑनलाइन शिक्षण देऊन सुट्टीवर मात केली आहे.
सध्या कोरोनाच्या सावटामुळे ऐन परिक्षेच्या दिवसांत महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्या मात्र सुट्टी जाहीर झाली तरी विद्यार्थ्यांची गोडी कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे शिक्षणाचा हट्ट धरला आणि शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणाचा नवा पर्याय शोधून शिक्षण पद्धतीत नवा पायंडा पाडलाय. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन शिक्षण पद्धतीत सहभाग नोंदवला. एकावेळी १०० विद्यार्थीं या ऑनलाइन शिक्षण पध्दतीत सहभागी होत आहेत. दिवसातुन तीन वेळा ऑनलाईन क्लास घेतले जातात यातुन विद्यार्थ्यांना रोजच्या शिक्षणाप्रमाणेच शिक्षण मिळत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.दिनेश रघुवंशी,प्रा.जमील शेकुवाले,प्रा. घननिल गजभिये,डॉ. सुनील राठोड़,प्रा.अतुल महाले द्वारा झूम क्लाऊड मीटिंग एप्प द्वारे विद्यादानाचा
कार्य करीत आहे.