मजहर शेख
नांदेड/किनवट, :- किनवट चे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज ता.२२ रोजी भेट दिली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून परिस्थीताचा आढावा घेतला. कोरोना व्हायरस संसर्गाबाबत सुचना करून काही अडचन असल्यास मद्दत करण्यास तत्पर असल्याचे सांगीतले. व कोरोना आजारा संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना तसेच home quarantine बद्दल माहिती घेतली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूती गृह ,औषधी भांडार,वार्ड इत्यादी ठिकाणी पाहणी केली व ऐकून कामकाजाबद्दल व स्वछ्ते बद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी डॉ.संदीप जाधव,डॉ.सुदर्शन चव्हाण,डॉ. दिलीप मंडलवार,डॉ.थोटे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. तर दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज असून जवळील परिसर स्वच्छ असून कर्मचारी कोरोना संदर्भातील घडामोडीवर लक्ष ठेवून असुन त्याना सतर्क राहण्याच्या सुचना सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यानी केल्या.