Home विदर्भ सेलू परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट.!

सेलू परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट.!

130

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

अनेकांच्या घरावरील टीना उडाल्या

वर्धा – जिल्ह्यातील सेलू परिसरात आज अचानक दुपारी एक वाजताचे सुमारास वादळी वारा गरपीटसह जोरदार पाऊस झाला.अर्धा ते पाऊण तास गरपीटसह पाऊस पडत होता. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील महाबळा, कोटंबा, इटाळा, जंगलापूर या गावात अचानक वादळी वाऱ्यासह बोरा ऐवढी झालेल्या गाराने गावाला चांगलेच झोडपले. अर्धा तास झालेल्या या गारपीट आणि पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला.
सध्या अनेक लोकांच्या शेतात माळव भाजीपाल्याचे पीक असून गारपिटीचा या पिकांना मोठा फटका बसला असल्याचे सांगितले जाते. वादळ वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसाने अनेकांच्या घरावरची छप्पर उडाली आहे.
सध्या उन्हाळवाहीचे कामें सुरु आहे. दर चार आठ दिवसा दरम्यान अवकाळी पाऊस आपली हजेरी लावत असल्याने जमीनीत ओलावा कायम आहे. खरीफ पीक पेरणीकरिता जमीन तापने महत्वाचे आहे. परंतू पाण्याला उसंती मिळत नसल्याने शेतकऱ्याला जमीनीची उन्हाळवाही करने कठीण झाले आहे.एकीकडे संसर्गजन्य कोरोना आजाराने संचारबंदी , सीमाबंदी, जमावबंदीला तोंड देत नाकी नऊ आले असून शेती करणे कठीण झाले आहे तर दुसरीकडे निसर्ग ही कोपल्या सारखा राहून राहून अधामधात रंग दाखवित आहे.अक्षय त्रुतिया होवून अद्यापही लॉकडाऊन मुळे क्रुषी केंद्रात बियाणे आलेली नाही आहे.तसेही शेतकऱ्यांकडून बियांबाबत कृषी केंद्रातही विचारणा करण्यासाठी शेतकरी फिरकतांना दिसून येत नाही.नुकसानीच्या अंदाजीची माहिती सध्या मिळालेली नाही.